‘ढोबळी’च्या ‘उत्तम’ शेतीचा मंत्र; घाटनांद्रेत दीड एकरात 90 टन ढोबळीचे उत्पादन | पुढारी

‘ढोबळी’च्या ‘उत्तम’ शेतीचा मंत्र; घाटनांद्रेत दीड एकरात 90 टन ढोबळीचे उत्पादन

प्रवीण जगताप : घाटनांद्रे येथे दीड एकर क्षेत्रात आठ-नऊ महिन्यात चक्क 90 टन ढोबळी मिरचीचे (Capsicum Green ) उत्पादन एका पठ्ठ्याने घेऊन दाखवले आहे. 24 तोड्यात ही किमया प्रयोगशील अभ्यासू शेतकरी वैभव शिंदे यांनी करून दाखवली आहे. सांगली येथील ढोबळी मिरची व द्राक्ष पिकात शेतकर्‍यांना उच्चांकी उत्पादनाची मजल मारण्यासाठी ‘कोच’ स्वरूपात काम करणारे वीरा अ‍ॅग्रो सोल्युशन्सचे वृषाल पाटील आणि पृथ्वीराज हजारे यांनीदेखील अशा धाडशी शेतकर्‍यांना सोबत घेऊन आपल्या जीवाचे रान करून जणू ‘मातीतलं सोनं’ शोधून काढले आहे.

Capsicum Green प्रगतिशील शेतकरी वैभव शिंदे यांनी दीड एकरात 90 टन ढोबळी मिरचीचे उत्पादन

वैभव शिंदे यांनी आठ महिन्यांपूर्वी इंडस-11 या ढोबळी मिरचीची साठ गुंठ्यात लागवड केली. गतवर्षीच्या वेळी उत्पादन चांगले झाले पण आपले रान लवणात होते त्यामुळे पावसाचा त्रास झाला होता. तो त्रास होऊ नये म्हणून रानातील पाण्याचा निचरा होईल असे सर्वच उपाय लागवडीआधीच त्यांनी केले होते. लागवड केल्यानंतर 45 व्या दिवशीच पहिला तोडा सुरू झाला. पाहिले आठ तोडे दर सात-आठ दिवसांनी येत होते. पहिले तोडे दरात कमी असले तरी उत्पादनात उच्चांकी होते. तर नंतर उत्पादन घटू लागले असताना दर वेगाने वाढत गेले होते. पहिल्या दोन-तीन तोड्यात आठ रुपये किलो असणारा दर क्रमशः वीस, तीस, चाळीस, पन्नास आणि पुढे उच्चांकी 64 रुपयेपर्यंत किलोला दर मिळाल्याचे वैभव शिंदे सांगतात. सरासरी आठ महिने 35 रु. किमान दर मिळाला असल्याचे यातून सिद्ध झाले आहे.

वृषाल पाटील ‘वर्क फ्रॉम फार्म, वर्क फॉर फार्म आणि वर्क फ्रॉम होम’ तिन्ही रीतीने कार्यरत 

शिंदे यांचे गाईड आणि शेतीतील ‘कोच’ असलेले वृषाल पाटील यांनी आपले मार्गदर्शन कधी थेट शेतात तर कधी ऑनलाईन फोन वरून, कधी व्हिडीओ कॉल करून जणू ‘शेतीसाठी कायपण’ हा आपला होरा मनी ठेऊन स्वतः वृषाल पाटील आणि त्यांची वीरा अ‍ॅग्रो सोल्युशन्सची टीम कार्यरत राहिली. कोरोना लॉकडाऊन त्यांना कधीच रोखू शकला नव्हता आणि नाही. त्यामुळे मार्गदर्शन आणि प्लॉट व्हिजिट सतत होत राहिल्याने 23-24 तोडे प्लॉट टिकविता आला आणि उत्पादन 90 टन इतके होऊ शकले, असेही शिंदे म्हणाले.

Capsicum Green दीड एकर ढोबळी मिरची वगळता शिंदे यांची 14 एकर द्राक्षबाग आहे. त्यातही वृषाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेटके उत्पादन निघते. मागील 2 वर्षे द्राक्षबागेलाही वृषाल पाटील यांचे कन्सल्टिंग घेत आहेत. विशेष म्हणजे ढोबळी मिरचीनंतर त्याच रानात पुढील पीक म्हणून डॉगरेज रोपे लावून केलेल्या द्राक्षशेतीस ते रान अधिक उपयुक्त ठरले असून या रानातही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पीक द्राक्षांचे घेणार आहेत.वीरा अ‍ॅग्रोची सर्वच उत्पादने वापरात : द्राक्षबाग असो की ढोबळी मिरची विविध टप्प्यावर आणि विविध गरजेनुसार आयबी सुपर, स्प्रे, बुरशीनाशक -के लॉक, व्हीपी- 96, फुगवणीसाठी व्ही.जी. फ्रूट साईज अशी विविध उत्पादने वापरली असून ती अत्यंत गुणकारी ठरली आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

मागील तीन-चार वर्षांपासून वृषाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ढोबळी मिरचीचे आम्ही उत्पादन घेतो. 1100 रोपांची पाऊण एकरात लागण केली असून 4 तोड्यात 15 टन उत्पादन निघाले आहे. तर दर 47 ते 55 रु. किलो मिळाला असून किमान 10 तोड्यापर्यंत प्लॉट टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहे. सध्याचा दर आणि उत्पादन पाहता वृषाल पाटील यांच्या सोबतीने 5 मार्च व एप्रिलमध्ये 1 असे दोन इंद्रा जातीचे प्लॉट लागण करणार आहे. वातावरण प्रतिकूल असले तरी कमी रोपात यंदा चांगले उत्पादन मिळत आहे.
– अनिल चव्हाण, ढोबळी मिरची उत्पादक, रामपूर (ता. जत) संपर्क : 8080500817

माझे तीन प्लॉट मिळून 5 एकर ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू आहे. ज्याचा 9 वा तोडा सुरू आहे, त्या प्लॉटला अगदी उच्चांकी 90 रु. ते 55 रु. प्रतिकिलो असे विक्रमी दर मिळाले आहेत. ज्या प्लॉटचा दुसरा तोडा सुरू आहे, त्या दुसर्‍या तोड्यात जनरल एक-दीड टन उत्पादन निघते तिथे 4930 किलो म्हणजेच जवळपास 5 टन उत्पादन निघाले असून तिसर्‍या, चौथ्या दोन्हीत ते उत्पादन 7 ते 8 टन इतके होईल आणि चारच तोड्यात मिरचीच्या कंपनीच्या मतानुसार 30 टन उत्पादन आकडा पूर्ण होईल. पुढील सर्व तोडे जणू अतिरिक्‍त उत्पादन होईल. तर चौथा तोडा सुरू असलेल्या एका प्लॉटमध्ये 6710 किलो मिरची निघाली आहे. हे उच्चांकी उत्पादन केवळ वृषाल पाटील यांच्यामुळे शक्य झाले असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात कोणी त्यांचा हात धरू शकत नाही. रोग येण्यापूर्वीच उपचार सुरू केले जातात. चौथा डोस दिला की, पाटीलसाहेब किंवा टीम मेंबर व्हिजिट करतात. त्यांचे शेड्युल पाळले तर उत्पादनाची चिंता राहत नाही. – अमोल भगाटे, ढोबळी मिरची उत्पादक, नांदणी (ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) संपर्क : 7020352861

हेही वाचलतं का?

Back to top button