Tips to wake up early: सकाळी जाग येत नाही, जाग आल्यावर फ्रेश वाटत नाही? या सवयी लावा, एक रुपयाचाही खर्च नाही

Early Morning Wake up Routine: तुम्ही किती वाजता उठता यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दररोज एकाच वेळेस उठता का?
Tips to wake up early: सकाळी जाग येत नाही, जाग आल्यावर फ्रेश वाटत नाही? या सवयी लावा, एक रुपयाचाही खर्च नाही
Published on
Updated on

Best Way to Wake Up In Morning Explain In Marathi

मुंबई : आपल्याला रात्री झोपण्यासाठी अनेक टिप्स दिल्या जातात, पण सकाळी उठण्याचा योग्य आणि आरोग्यदायी मार्ग कोणता? हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर काही झोप तज्ज्ञांनी दिले असून, त्यांनी सकाळ सुरू करण्याच्या आरोग्यदायी सवयी सांगितल्या आहेत.

सकाळचा वेळ हा तुमच्या संपूर्ण दिवसाचा टोन ठरवतो. त्यामुळे, उठण्याची वेळ नियमित ठेवा, सूर्यप्रकाशाचा लाभ घ्या, स्नूझ टाळा आणि झोपेच्या वेळा पाळा. ही साधी पण प्रभावी सवय तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Tips to wake up early: सकाळी जाग येत नाही, जाग आल्यावर फ्रेश वाटत नाही? या सवयी लावा, एक रुपयाचाही खर्च नाही
Sleep deprivation | अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर होतात गंभीर दुष्परिणाम...

'या' सवयींमुळे तुमची सकाळ देखील होईल आनंदी

1. झोपेतून उठायच्या वेळेत हवं सातत्य

तुम्ही किती वाजता उठता यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दररोज एकाच वेळेस उठता का? हे आहे. झोप विषयाचे तज्ज्ञ सांगतात की, आपल्या शरीराचे जैविक घड्याळ (circadian rhythm) ठराविक वेळेनुसार काम करतं. जर आपण रोज वेगवेगळ्या वेळी उठलो, तर मूड, पचनक्रिया, ऊर्जा पातळी आणि एकाग्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो. झोपेतून उठायची योग्य वेळ कोणती असं थेट उत्तर नाही. तुमच्या शरीराला किमान आठ तास विश्रांती देणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवा.

२. सूर्यप्रकाशात जाणं – नैसर्गिक प्रकाशाचं महत्व

सकाळी उठल्यानंतर शक्य तितक्या लवकर सूर्यप्रकाश पाहणे गरजेचे आहे. खिडक्या उघडा, दिवे लावा आणि शक्य असल्यास बाहेर फिरायला जा. सूर्यप्रकाशामुळे शरीराला हे समजते की, दिवस सुरू झाला आहे. यामुळे शरीरात "कॉर्टिसोल" नावाचे हार्मोन स्रवू लागते, जे आपल्याला ताजेतवाने आणि ऊर्जावान बनवते.

तज्ज्ञ पुढे सांगतात की, सूर्यप्रकाश फक्त जागेपणच नाही, तर रात्रीची झोप सुधारण्यास देखील मदत करतो. प्रकाश डोळ्यांवर पडल्यावर शरीरात "मेलाटोनिन" या झोपेसाठी महत्त्वाच्या हार्मोनच्या निर्मितीची तयारी सुरू होते.

Tips to wake up early: सकाळी जाग येत नाही, जाग आल्यावर फ्रेश वाटत नाही? या सवयी लावा, एक रुपयाचाही खर्च नाही
Sleep Benefits| गाढ झोपेसाठी नियमित आंघोळ ठरते महत्वाची

३. ‘स्नूझ’ बटण टाळा – सततचा अडथळा

अलार्म वाजल्यावर तो बंद करून स्नूझ मारणे म्हणजे शरीराला वारंवार व्यत्यय देणे. तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला झोप अधिक हवी असेल, तर सरळ अलार्म थोडा उशिराने सेट करा आणि एकसंध झोप घ्या. स्नूझ मारल्यानंतर होणारी झोप ही अधुरी असते आणि उठल्यावरही शरीर जड होऊन सुस्ती जाणवते. दिवसभर वारंवार आळस येऊ शकतो.

४. शनिवार-रविवारी फार झोपू नका

सुट्टीच्या दिवशी फार उशिरा झोपून उठणं शरीराच्या जैविक घड्याळाला गोंधळात टाकते. तज्ज्ञ सांगतात की, जर खूप थकवा जाणवत असेल, तर तुम्ही थोडीशी झोप वाढवू शकता, जास्तीत जास्त एक तास. पणत्यापेक्षा अधिक झोपल्यास ‘सोशल जेटलॅग’ होऊ शकतो, म्हणजेच शरीराची नैसर्गिक वेळ आणि घड्याळाची वेळ यात तफावत निर्माण होते.

Tips to wake up early: सकाळी जाग येत नाही, जाग आल्यावर फ्रेश वाटत नाही? या सवयी लावा, एक रुपयाचाही खर्च नाही
late night Sleep : रात्री उशिरा झोपता का? बातमी आपल्यासाठी

५. जर शक्य असेल, तर सकाळच्या फेरफटक्याचा विचार करा

Mt. Sinai मेडिकल स्कूलच्या डॉ. मरियाना फिगुइरो सांगतात की, सकाळच्या नियमित फेरफटक्याने, विशेषतः जर तुम्ही पाळीव कुत्रा फिरवायला नेत असाल, तर शरीर नियमित वेळेस उठण्याची सवय लावते. यामुळे प्रकाशही मिळतो आणि हालचालही होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news