Royal Enfield EV | रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच; जाणून घ्‍या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield EV | दमदार आवाजासाठी ओळखली जाणार्‍या कंपनीचे अधिकृतपणे इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात पाऊल
Royal Enfield EV
'रॉयल एनफील्ड'ने अधिकृतपणे इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
Published on
Updated on

royal enfield flying flea c6 electric bike launch

मुंबई : आतापर्यंत आपल्या दमदार आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'रॉयल एनफील्ड'ने अधिकृतपणे इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक 'Flying Flea C6' (फ्लाइंग फ्ली C6) भारतीय बाजारपेठेत लाँच केली असून, ही बाइक अत्याधुनिक फीचर्ससह सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या १२४ किलो वजनाची ही बाइक ग्राहकांसाठी १० एप्रिलपासून बुकिंग आणि टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध होणार आहे.

किंमत आणि 'बॅटरी सबस्क्रिप्शन' प्लॅन

  • रॉयल एनफील्डने ही बाइक दोन वेगवेगळ्या किमतींच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिली आहे: एक्स-शोरूम किंमत: या बाइकची मूळ एक्स-शोरूम किंमत २.७९ लाख रुपये आहे.

  • BaaS मॉडेल (Battery as a Service): ग्राहक बॅटरी सबस्क्रिप्शन मॉडेलअंतर्गत ही बाइक खरेदी करत असतील, तर तिची किंमत १.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी असेल.

Royal Enfield EV
डुकाटीची Desmo450 MX भारतात लॉन्च; १७.२४ लाख किंमत, जाणून घ्या काय आहे खास?

बुकिंग आणि डिलिव्हरी

'रॉयल एनफील्ड'च्‍या इलेक्ट्रिक बाइकची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी १० एप्रिलपासून बुकिंग सुरु होणार आहे. तसेच त्याच दिवसापासून टेस्ट ड्राइव्हही सुरू होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेरीस या बाइकची प्रत्यक्ष डिलिव्हरी सुरू करण्यात येईल.

Royal Enfield EV
Smartphone Price Hikes: स्मार्टफोन महागणार, सध्याचे मॉडेल 3 हजारपर्यंत, यावर्षी लाँच होणाऱ्या किंमती कितीने वाढणार?

रॉयल एनफील्डची इलेक्ट्रिक बाइकची वैशिष्ट्ये

  • या बाइकचे एकूण वजन केवळ १२४ किलो आहे, ज्यामुळे ती हाताळण्यास अत्यंत सोपी आहे.

  • इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये असूनही रॉयल एनफील्डने यात क्लासिक लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधला आहे.

  • ग्राहकांना बॅटरीचा खर्च कमी करण्यासाठी 'बॅटरी एज सबस्क्रिप्शन'चा पर्यायही देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news