Smartphone Price Hikes: स्मार्टफोन महागणार, सध्याचे मॉडेल 3 हजारपर्यंत, यावर्षी लाँच होणाऱ्या किंमती कितीने वाढणार?

Smartphone Prices to Rise Again Before Festive Season: भारतातील चिनी स्मार्टफोन कंपन्या सणासुदीच्या हंगामापर्यंत मोबाईलच्या किमती आणखी वाढवण्याच्या तयारीत आहेत. मेमरी आणि स्टोरेजसारख्या घटकांच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ केली जात आहे.
Smartphone Price Hikes
Smartphone Price HikesPudhari
Published on
Updated on

Chinese Smartphone Price Hike India: भारतातील चिनी स्मार्टफोन कंपन्या येत्या काही महिन्यांत मोबाईलच्या किमती पुन्हा वाढवण्याच्या तयारीत आहेत. मोबाईलच्या सुट्ट्या भागांच्या (कॉम्पोनंट्स) वाढत्या किमतींमुळे, विशेषतः मेमरी आणि स्टोरेज महाग झाल्याने, कंपन्यांवर हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मते, सणासुदीच्या हंगामापर्यंत किमान दोन टप्प्यांत आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दरवाढीला ग्राहकांनी फारसा विरोध केला नाही. यामुळे कंपन्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला असून, पुढील दरवाढीचे संकेत मिळत आहेत. एका स्मार्टफोन कंपनीतील अधिकाऱ्याने सांगितले की, ही दरवाढ एकदा होणारी नाही. पहिला टप्पा वर्षाच्या सुरुवातीला झाला आहे, दुसरा टप्पा दुसऱ्या तिमाहीत अपेक्षित आहे, तर तिसरा आणि सर्वात मोठा टप्पा दिवाळीच्या काळात लागू केला जाऊ शकतो.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन मॉडेल्सच्या किमती सुमारे 1,000 ते 3,000 रुपयांनी वाढल्या आहेत. बाजार अभ्यासकांच्या मते, 2026 च्या सुरुवातीला लाँच होणारे नवे मॉडेल्स त्यांच्या आधीच्या मॉडेल्सपेक्षा 2,000 ते 5,000 रुपयांनी महाग होऊ शकतात.

दरवाढीचा परिणाम मागणीवर होऊ शकतो, याची जाणीव कंपन्यांना आहे. त्यामुळे अनेक ब्रँड्सनी आपल्या विक्रीचे टार्गेट कमी केले आहे. वार्षिक आणि तिमाही विक्रीचे अंदाज सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, साठा (इन्व्हेंटरी) कमी ठेवण्याचे धोरण आहे.

बाजार संशोधन संस्था काउंटरपॉइंट रिसर्च यांच्या मते, 2025 च्या अखेरीसच कंपन्यांनी सणानंतरची मागणी कमी होण्याची शक्यता ओळखून साठ्यात (इन्व्हेंटरी) बदल केले होते. दिवाळीच्या सुमारास होणारी तिसरी दरवाढ ग्राहकांना झेपेल का, याबाबत शंका आहे. जर ग्राहकांनी दरवाढ स्वीकारली नाही आणि साठा वाढू लागला, तर कंपन्यांना पुन्हा दरकपातीचा विचार करावा लागू शकतो, असेही काही अधिकाऱ्यांचे मत आहे.

Smartphone Price Hikes
Gig Workers Strike: गिग वर्कर्सची मोठी घोषणा; आज संपूर्ण भारतात काम बंद आंदोलन, काय आहे कारण?

तरीही, कंपन्या आता संख्येपेक्षा मूल्यवाढीवर लक्ष केंद्रित करत आहेत. एका अधिकाऱ्याच्या मते, स्मार्टफोनच्या विक्रीत घट झाली, तरी सरासरी विक्री किंमत (ASP) वाढल्याने महसूल 20 ते 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

या बदलांमुळे स्मार्टफोन उद्योगात कन्सॉलिडेशन होण्याची शक्यता आहे. लहान ब्रँड्स आपली मॉडेल्स कमी करतील किंवा मोठ्या मूळ कंपन्यांमध्ये विलीन होतील, असे संकेत आहेत.

Smartphone Price Hikes
India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारातील 7 महत्त्वाचे मुद्दे कोणते? ट्रम्प–मोदी चर्चेत नेमकं काय ठरलं?

उद्योगातील एका अधिकाऱ्याच्या मते, Xiaomi ने आपला सब-ब्रँड ‘पोको’ पुन्हा आणला आहे, तर Realme हा ब्रँड त्याच्या मूळ कंपनी Oppo मध्ये विलीन झाला आहे. तसेच, ‘नथिंग’ या स्मार्टफोन ब्रँडने 2026 साठीचा आपला प्रीमियम फ्लॅगशिप फोन रद्द करण्याची घोषणा केली असून, इतर उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, Xiaomi कंपनीने सांगितले की, मेमरी आणि स्टोरेजसारख्या महत्त्वाच्या घटकांच्या किमती वाढत असताना, कंपनीत काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. Oppo कडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. थोडक्यात स्मार्टफोन स्वस्त मिळण्याचे दिवस आता संपले आहेत, येत्या काळात ग्राहकांना मोबाईलसाठी अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news