डुकाटीची Desmo450 MX भारतात लॉन्च; १७.२४ लाख किंमत, जाणून घ्या काय आहे खास?

लक्झरी आणि सुपर बाईक्ससाठी प्रसिद्ध असलेली इटालियन दुचाकी निर्माता कंपनी Ducati ने भारतात आपली पहिली डर्ट बाईक Desmo450 MX लॉन्च केली आहे.
Ducati Desmo450 MX India launch
Ducati Desmo450 MX India launchfile photo
Published on
Updated on

Ducati Desmo450 MX India launch

नवी दिल्ली: लक्झरी आणि सुपर बाईक्ससाठी प्रसिद्ध असलेली इटालियन दुचाकी निर्माता कंपनी डुकाटीने भारतात आपली पहिली डर्ट बाईक Desmo450 MX लॉन्च केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत १७.२४ लाख रुपये आहे. प्रामुख्याने ऑफ-रोड रेसिंगसाठी ही बाईक तयार करण्यात आली असून ताकद आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

दमदार इंजिन आणि परफॉर्मन्स

डुकाटी Desmo450 MX मध्ये नव्याने विकसित केलेले ४४९.६ सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६३.५ बीएचपी पॉवर आणि ५३.५ एनएम टॉर्क निर्माण करते. स्मूथ रायडिंगसाठी यामध्ये ५-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे, ज्यामुळे कठीण रस्त्यांवरही ही बाईक उत्तम नियंत्रण राखते. तसेच इंधनाशिवाय या बाईकचे वजन केवळ १०४.८ किलोग्रॅम आहे, ज्यामुळे ती अत्यंत चपळ आणि रेसिंगसाठी उपयुक्त ठरते.

Ducati Desmo450 MX India launch
अर्थवार्ता : 'मेड इन इंडिया'चा अमेरिकेत डंका! इंजिनीअरिंग, औद्योगिक उत्पादनांसाठी सुवर्णसंधी

वैशिष्ट्ये जाणून घ्या

  • रायडर्सचा अनुभव अधिक सुरक्षित आणि थरारक करण्यासाठी कंपनीने यात अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत.

  • विविध रस्ते आणि परिस्थितीनुसार रायडिंग मोड्सची निवड करण्याची सोय.

  • दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स, डीटीसी, ईबीसी आणि फॉल डिटेक्शन सिस्टीम.

  • क्विक शिफ्ट अप, पॉवर लाँच, लिथियम आयन बॅटरी आणि ॲडजस्टेबल हँडल बार.

  • आरामदायी सिंगल सीट.

  • ही दुचाकी ऑफ-रोडिंग आणि मोटोक्रॉस शौकिनांसाठी डिझाइन करण्यात आली असल्यामुळे यात लाईट्स, मिरर किंवा रोड-लीगल उपकरणे दिलेली नाहीत.

रेसिंग स्टाईल मेंटेनन्स

ही पूर्णपणे रेसिंगसाठी बनवलेली मशीन असल्यामुळे तिच्या देखभालीसाठीही रेसिंग स्टाईल शेड्यूल ठेवण्यात आले आहे. यात दर १५ तासांनी इंजिन ऑइल बदलणे आणि ४५ तासांनी पिस्टन बदल व व्हॉल्व क्लिअरन्स तपासणी करणे आवश्यक आहे.

किंमत किती?

भारतीय बाजारपेठेत या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १७,२३,६०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक सध्या केवळ निवडक शहरांमधील ४ डीलरशिप्सवर उपलब्ध असेल. यामध्ये पुणे, नवी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई यांचा समावेश आहे.

Ducati Desmo450 MX India launch
AI ने बनवली भविष्याची कार, तिच्या डिझाईन पुढे सुपर कार्सही फिक्या...मात्र बाहेरून दिसतात..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news