Audi e-tron GT भारताची पहिली Electric Supercar लॉन्च

Audi e-tron GT भारताची पहिली Electric Supercar लॉन्च
Audi e-tron GT भारताची पहिली Electric Supercar लॉन्च

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Audi e-tron GT : ऑडी ई-ट्रॉन जीटी, भारताची पहिली इलेक्ट्रिक सुपरकार बुधवारी लाँच झाली. कंपनीची ही कार उर्वरित आरएस मॉडेलपेक्षा वेगळी आहे. ऑडी ई-ट्रॉन जीटी फक्त २२ मिनिटांत ५ ते ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. चला तर जाणून घेऊया देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक सुपरकारविषयी…

एखादी कार सुपरकार कशी बनवते? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर कारला सुपरकार बनवण्यामागे महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कार धावण्याचा 'वेग'. या संदर्भात ऑडी ई-ट्रॉन जीटी उत्तम प्रकारे बसते. कंपनीने आपले दोन प्रकार ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी लाँच केले आहेत. यामध्ये, ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी फक्त ३.३ सेकंदात ० ते १०० किमीचा पिकअप पकडते. तर हाच वेग ऑडी ई-ट्रॉन जीटी ४.१ सेकंदात गाठते.

या दोन्ही ऑडी कारमध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. ऑडी ई-ट्रॉन जीटीची मोटर ६३० एनएमचा (Nm) चा पीक टॉर्क आणि जास्तीत जास्त ३९० किलोवॅटची शक्ती निर्माण करते. तर ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी ८३० एनएमचा (Nm) चा पीक टॉर्क आणि जास्तीत जास्त ४७५ kW (केडब्ल्यू) इतकी शक्ती निर्माण करते.

या दोन्ही सुपर कारची रेंजही खूप छान आहे. ऑडी ई-ट्रॉन जीटी सिंगल म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर ३८८ ते ५०० किमी पर्यंत धावते. तर ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी सिंगल चार्जमध्ये ४०१ ते ४८१ किमी पर्यंतचा प्रवास करू शकते. या वाहनांमध्ये कंपनीने अनुक्रमे ९३.४ kWh आणि ८३.७ kWh बॅटरी दिल्या आहेत.

ऑडी ई-ट्रॉन जीटीमध्ये कंपनीने सर्वोत्तम श्रेणीतील २२ kW AC आणि २७० kW DC चार्जिंगचा पर्याय दिला आहे. त्याचे 270 किलोवॅट पर्यंतचे ८०० व्होल्ट तंत्रज्ञान चार्जिंग पॉवर फक्त २२ मिनिटांत ५ ते ते ८० % पर्यंत चार्ज करते. एवढेच नाही तर या कारमध्ये दोन्ही बाजूला चार्जिंग फ्लॅप देण्यात आले आहेत जेणेकरून कोणत्याही दिशेने पार्किंग झाल्यास ते सहज चार्ज करता येईल.

ऑडी ई-ट्रॉन जीटीला समोरच्या बाजूला हनीकॉम्ब डिझाइन रेडिएटर ग्रिल मिळते. समोरची सिंगल फ्रेम त्याला एक खास लुक देते. 5-स्पोक डायमंड टर्न अलॉय व्हील त्याला प्रीमियम टच देतात. याशिवाय, अॅक्टिव्ह रियर स्पॉयलर, फिक्स्ड पॅनोरामिक सनरूफ, लेझरसह मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प आणि डायनॅमिक लाईट सिक्वन्सिंग, डायनॅमिक टर्न इंडिकेटर्ससह एलईडी रियर कॉम्बिनेशन दिवा आणि हीटेड एक्सटीरियर मिरर जे इलेक्ट्रिकली ॲडजेस्टेबल, फोल्डिंग, प्री-सेट मेमरीवर फिक्स राहतात. या सर्व फिचर्सच्या जोरावर ऑडीच्या या दोन्ही कार लक्जरी सुपर कार बनण्यात यशस्वी झाल्या आहेत.

ऑडी ई-ट्रॉन जीटीच्या इंटीरियरची बद्दल काय बोलायचे? नेहमीप्रमाणेच या दोन्ही कारचे इंटीरियर ऑडी कारर्सचा लक्झरीपणा कायम ठेवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. इंटीरियरमध्ये एयर क्वालिटी पॅकेज, नप्पा लेदर अपहोल्स्ट्री, मसाज सुविधा आणि १८ पद्धतीने ॲडजेस्टेबल करता येतील अशा स्पोर्ट्स सीट्स यांचा समावेश आहे. याच बरोबर मसाज करण्याची सुविधा, अॅम्बियंट लाइटिंग पॅकेज, ३ एअर-कंडीशनिंग सिस्टीमही देण्यात आले आहे.

कंपनीने ऑडी ई-ट्रॉन जीटीमध्ये ऑडीचे व्हर्चुअल कॉकपिट, टच करून चालणारा एमएमआय नेविगेशन प्लस ((MMI), थ्री डी साउंड सोबत बी अँड ओ (B&O) प्रीमियम साउंड सिस्टम, ऑडी स्मार्टफोन इंटरफेस आणि वायरलेस चार्जिंगबरोबर ऑडी फोन बॉक्स देण्यात आला आहे. यात लेन चेंज वॉर्निंग, ३६० डिग्री कॅमरा असे वैविद्यपूर्ण फीचर्ससुद्धा दिले आहेत.

कंपनीने ९ रंगांमध्ये ऑडी ई-ट्रॉन जीटी सादर केली आहे. यात इबिस व्हाईट, एस्करी ब्लू, डेटोना ग्रे, फ्लोरेट सिल्व्हर, कॅमोरा ग्रे, मिथोस ब्लॅक, सुझुका ग्रे, टॅक्टिक्स ग्रीन आणि टँगो रेड या रंगांमध्ये ग्राहकांना कार उपलब्ध होणार आहे. कंपनीने या कारचे ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे. तसेच कंपनीकडून ग्राहकांच्या सोयीसाठी कार चार्जिंग करण्यासाठी देशातील ७५ शहरांमध्ये १०० हून अधिक विशेष चार्जिंगची सुविधा दिली जाणार आहे.

ऑडीच्या पहिल्या इलेक्ट्रिक सुपरकारची किंमत १.८० कोटी रुपयांपासून सुरू होते. कंपनी यावर २ ते ५ वर्षांच्या सेवा योजना देत आहे. तर बॅटरीवर २ वर्षांची स्टँडर्ड आणि ८ वर्षांची हाय व्होल्टेज वॉरंटी दिली जाणार ​​आहे. ही सुविधा १.६० लाख किमी पर्यंत वैध आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news