Wedding Card Vastu Tips: लग्नपत्रिकेत कोणते रंग, धार्मिक प्रतिके अन् आकार असू नयेत... नवदांपत्यांसाठी असतात अशुभ

Wedding Card Vastu Tips
Wedding Card Vastu Tipspudhari
Published on
Updated on

Wedding Card Vastu Tips: लग्न सराईचे दिवस काही काळातच सुरू होणार आहे. हिंदू धर्मानुसार लग्न हा फक्त दोन जिवांचे मिलन नसून तो एक पवित्र संस्कार मानण्यात आला आहे. या मंगलमय कार्याची सुरूवात ही लग्नपत्रिका छापण्यानं होते.

शास्त्रानुसार लग्नपत्रिका ही फक्त एक आमंत्रण नसतं तर नवदांपत्याच्या नवीन जीवनाची एक सकारात्मक सुरूवाती करण्याचे माध्यम असते. त्यामुळं लग्नपत्रिकेचा रंग, डिझाईन आणि शब्दांची निवड याचा पती - पत्नींच्या भविष्य आणि वैवाहिक जीवनावर प्रभाव पडतो. जर तुमच्याही घरात लगीन घाई सुरू होणार आहे तर त्यापूर्वी लग्नपत्रिका छापण्यापूर्वी त्याचे काही नियम आणि टिप्स चुकूनही विसरू नका.

Wedding Card Vastu Tips
Wedding season : अधिक मासापूर्वी लग्नसराईची धामधूम जोरात

कोणत्या रंगाचे कार्ड असावे?

शास्त्रानुसार लग्नपत्रिकेच्या रंगाचा आणि ऊर्जेचा थेट संबंध असतो. लग्नपत्रिकेसाठी लाल, पिवळा, केशरी, मरून किंवा सोनेरी रंग शुभ मानला गेला आहे. लाल रंग हा प्रेम आणि सौभाग्याचं प्रतिक असतो तर पिवळा आणि केशरी रंग हा भगवान विष्णू आणि गुरूशी जोडला आहे. यामुळं वैवाहिक जीवन सुखकर होतं.

Wedding Card Vastu Tips
Wedding season : अधिक मासापूर्वी लग्नसराईची धामधूम जोरात

शुभ प्रतिके असणे गरजेचे

लग्नपत्रिकेवर योग्य आणि शुभ पवित्र चिन्हे असणं गरजेचं असतं. यामुळं लग्नपत्रिकेची ऊर्जा वाढते. लग्नाच्या कार्डवर गणपती, स्वस्तिक, ओम किंवा कलश यांचे चित्र असणे गरजेचे आहे. गणपती हे विघ्नहर्ता आहेत. त्यामुळं लग्न निर्विघ्नपणे संपन्न व्हावं यासाठी महत्वाचं आहे. लग्नपत्रिकेत देवी देवतांची आधुनिक AI जनरेटेड फोटे असू नयेत.

Wedding Card Vastu Tips
नवरी प्रियकरासोबत पळाली...धाकट्या बहिणीसोबत ठरलं लग्न..मात्र एका गुपिताने साऱ्यावरच पाणी फिरलं...

लग्नपत्रिकेचा आकार कसा असावा?

आजकाल मार्केटमध्ये विविध आकारांचे कस्टमाईज साईजमध्ये लग्नपत्रिका मिळते. मात्र लग्नपत्रिकेच्या आकाराचे काही नियम आहेत. लग्नपत्रिकेचा आकार हा कायम आयताकृती असावी किंवा चौकोणी असावी. हा आकार कायम संतुलन दर्शवतो.

अंडाकृती, गोल किंवा टोकदार त्रिकोणी लग्नपत्रिका सहसा छापू नयेत. टोकदार वस्तू शूल या नकारात्मक ऊर्जा स्त्रोताचे प्रतिक मानलं गेलं आहे.

Wedding Card Vastu Tips
UP Wedding news: लग्नमांडवात पोलिसांना घेऊन प्रेयसी आली; नवरीला घेऊन नवरदेवाने धूम ठोकली, पुढे काय घडलं?

शब्दांची निवड कशी असावी?

लग्नपत्रिकेवरील शब्दांची निवड आणि भाषा ही आदरपूर्वक असावी. लग्नपत्रिकेची सुरूवात नेहमी ओम श्री गणेशाय नम: किंवा कोणत्याही शुभ श्लोकाने करावी. अशा शब्दांची निवड करण्यात यावी जे वातचाना पाहुण्यांना अडचण येऊ नये. अस्पष्ट किंवा फार वळणदार फाँटमध्ये लग्नपत्रिका छापणे टाळावे. चांबडे किंवा चकमकीत केमिकलयुक्त पेपर वापरणे टाळावे.

आजकाल काही लोक कार्डवर लेदर फिनिशिंग किंवा सिंथेटिक चमकदार केमिकल वापरतात. नियमानुसार चमडे हे अशुद्ध मानलं गेलं आहे. त्यामुळं लग्नपत्रिकेत याचा वापर होऊ नये. इको फ्रेंडली हँडमेड पेपरचा वापर सर्वोत्तम.

Wedding Card Vastu Tips
Wedding Dates | अधिक मासाचा प्रभाव: वधू-वरांना शुभविवाहांसाठी करावी लागणार महिनाभर प्रतीक्षा

आधी करा हे काम

लग्नपत्रिका ज्यावेळी छापून येईल त्यावेळी शास्त्रानुसार सर्वात आधी आपल्या घरातील मंदिरात गणपतीच्या चरणांवर ती अरपण करावी. त्यानंतर दुसरी पत्रिका ही कुलदेवी कुलदेवता यांच्या नावावर काढावी. त्यानंतरच नातेवाईक आणि मित्रांना लग्नपत्रिका वाटप करणे सुरू करावे. यामुळं लग्नात येणारे सर्व दोष दूर होतात अशी मान्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news