Shukra Gochar 2026 | पुढील १२ दिवस 'या' राशींचे नशीब पालटणार! शुक्र-मंगळाच्या संयोगाने जुळून आला धनलाभाचा योग

शुक्राचे मंगळाच्या नक्षत्रात जाणे काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार
Shukra Gochar 2026
Shukra Gochar 2026pudhari photo
Published on
Updated on

Shukra Rashifal Venus Transit 2026

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य आणि समृद्धीचा कारक मानले जाते. जेव्हा शुक्राचे राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते, तेव्हा त्याचा प्रभाव मेष ते मीन अशा सर्व १२ राशींवर पाहायला मिळतो. सध्या शुक्र ग्रह स्वतःच्या वृषभ राशीत विराजमान असून रोहिणी नक्षत्रात भ्रमण करत आहे. शुक्रवारी, (दि.८ मे) शुक्र आपले नक्षत्र बदलणार आहे. हिंदू पंचांगानुसार, ८ मे २०२६ रोजी रात्री ०९ वाजून ५१ मिनिटांनी शुक्र मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल. १९ मे पर्यंत शुक्र मंगळाच्या या नक्षत्रातच राहील. मृगशिरा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. शुक्राचे मंगळाच्या नक्षत्रात जाणे काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया त्या राशींबद्दल...

मेष राशीच्‍या जातकांच्‍या आत्‍मविश्‍वासात होईल वाढ

मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे शुक्राचे मंगळाच्या नक्षत्रात येणे तुमच्या वैयक्तिक आकर्षणात आणि आत्मविश्वासात वाढ करेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाची दखल घेतली जाईल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही अविवाहित असाल, तर एखाद्या खास व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते.

Shukra Gochar 2026
बुध ग्रहावरून आलेल्या दोन उल्कांचा शोध

वृषभ राशीच्‍या जातकांना व्‍यापारात होईल फायदा

शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. मंगळाच्या नक्षत्रात शुक्राचे गोचर झाल्यामुळे तुमच्यात जोखीम पत्करण्याची क्षमता वाढेल, ज्याचा व्यापारात मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल, पण सोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोतही खुले होतील. जमीन-जुमला किंवा बांधकाम क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठा नफा मिळू शकतो.

Shukra Gochar 2026
Pluto Facts : 'प्लूटो'बद्दलची 'ही' मनोरंजक तथ्ये वाचून तुम्हीही व्‍हाल थक्क

तूळ राशीच्‍या जातकांना धनलाभाचे योग

तूळ राशीच्या लोकांसाठी हे गोचर अचानक धनलाभाचे योग घेऊन येत आहे. तुमच्या बोलण्यातील प्रभाव वाढेल, ज्यामुळे तुम्ही बिघडलेली कामे मार्गी लावाल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखादे मंगल कार्य संपन्न होऊ शकते.

Shukra Gochar 2026
Gajkesari Rajyog 2026 | १८ मे पासून 'गजकेसरी राजयोग'; वृषभसह 'या' ५ राशींचे नशीब उजळणार!

वृश्चिक राशीच्‍या जातकांना नवीन जबाबादरीचे योग

वृश्चिक ही मंगळाची रास असल्यामुळे शुक्राचा हा प्रभाव तुमच्या प्रोफेशनल लाइफमध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्ही उत्साही अनुभवाल आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

कुंभ राशीच्‍या जातकांच्‍या सामाजित प्रतिष्‍ठेत वाढ

हा काळ तुमच्यासाठी सर्जनशील यशाचा आहे. जर तुम्ही कला, मीडिया किंवा मार्केटिंग क्षेत्राशी निगडित असाल, तर हा काळ तुमच्यासाठी 'गोल्डन पीरियड' ठरू शकतो. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन प्रभावशाली लोकांशी मैत्री होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news