पुढारी वृत्तसेवा
प्लूटो ग्रहाला सूर्याभोवती एकदा फिरण्यासाठी २४८ वर्षे लागतात. आता तो २३ मार्च २१७८ रोजी नवीन वर्ष साजरे करेल.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथील ११ वर्षीय व्हेनेशिया बर्नीने १९३० मध्ये पाताळाच्या रोमन देवतेच्या नावावरून या ग्रहाला प्लूटोला हे नाव दिले.
प्लूटोवरील एक दिवस सुमारे १५३ तासांचा असतो. हा एक दिवस पृथ्वीवरील सुमारे ६.४ दिवसांइतका आहे.
प्लूटोची रुंदी फक्त सुमारे १,४०० मैल आहे. या आकारमानानुसार प्लूटो भारतापेक्षा लहान आहे.
प्लूटोचे सरासरी तापमान -३८७°F (-२३२°C) असते, ज्यामुळे तेथे जीवसृष्टी टिकून राहण्यासाठी खूप थंड आहे.
प्लूटोवरील सर्वात उंच पर्वतांची उंची ६,५०० ते ९,८०० फूट आहे. ते पाण्याच्या बर्फाचे मोठे ठोकळे आहेत. यावर काही ठिकाणी मिथेनचा थर आहे.
कॅरॉन, निक्स, हायड्रा, केर्बेरोस आणि स्टिक्स हे प्लूटोला ५ ज्ञात चंद्र आहेत. कॅरॉन सर्वात मोठा आहे आणि त्याचा आकार प्लूटोच्या अर्धा आहे.
२००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने प्लूटोचे वर्गीकरण बटू ग्रह म्हणून केले, कारण इतर वस्तू त्याच्या कक्षेला ओलांडू शकतात.