

Gajkesari Rajyog 2026
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मे महिना अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या महिन्यात होणारे ग्रहांचे फेरबदल लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम करतील. मे महिन्याचा पंधरवडा उलटताच एक असा शुभ योग तयार होत आहे, जो अतिशय फलदायी मानला जातो. ज्योतिषीय गणनेनुसार, १८ मे रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे, या राशीत गुरु ग्रह आधीच विराजमान आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र आणि गुरु यांची युती होते, तेव्हा एक अतिशय शुभ योग तयार होतो, ज्याला 'गजकेसरी योग' असे म्हणतात. या योगाच्या प्रभावामुळे जीवनात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतात. १८ मे नंतर एकूण ५ राशींना या योगाचा उत्तम लाभ मिळणार आहे.
गजकेसरी योग मानवी जीवनावर नेमका कसा सकारात्मक प्रभाव टाकतो, हे जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार, या योगामुळे आयुष्यात रखडलेली कामे मार्गी लागतात. करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतात. या योगामुळे जीवनात सुख-शांती येते, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक समाधान मिळते. चंद्र मनाला शांती देतो, तर गुरु करिअर आणि नात्यांमधील अडचणी दूर करतो. म्हणूनच ही युती ५ राशींसाठी भाग्यकारक ठरणार आहे. जाणून घेवूया कोणत्या आहेत त्या राशी...
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ मोठा दिलासा घेऊन येईल. जुने वाद आणि मतभेद आता हळूहळू संपुष्टात येतील, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. मनातील गोंधळ कमी झाल्यामुळे तुम्ही शांत राहू शकाल. नोकरीमध्ये उत्तम यश मिळण्याचे योग आहेत. तसेच जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल.
या योगाच्या काळात कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. मनातील आनंद द्विगुणित होईल. काही लोक प्रवासाचे नियोजन करू शकतात. अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळाल्याने तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. एकूणच कर्क राशीसाठी हा योग अत्यंत लाभदायक ठरेल.
कन्या राशीसाठी हा काळ नाती आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे. तुमचे वागणे आणि स्वभाव तुमच्या फायद्याचे ठरेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊ शकते. प्रोफेशनल लाईफमध्ये प्रगती होईल आणि उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य असून, भविष्यात त्याचे चांगले फळ मिळेल.
तुला राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्यात योग्य संतुलन (Balance) निर्माण करणारा ठरेल. चालू असलेल्या समस्या हळूहळू कमी होतील, ज्यामुळे तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल. आरोग्याच्या तक्रारी असल्यास त्यात सुधारणा होईल आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा जाणवेल. लोकांशी असलेले संबंध सुधारतील आणि सामंजस्य वाढेल. गजकेसरी योग तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणेल.
मीन राशीच्या जातकांना या काळात स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या भावना आणि विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल. आरोग्याबाबत तुम्ही अधिक जागरूक व्हाल, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सुधारणा होईल. जुने वाद मिटण्याची शक्यता असून मन शांत आणि हलके राहील. व्यावसायिकांना नवीन संधी मिळाल्यामुळे मोठा नफा होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांना या योगाचा परिपूर्ण लाभ मिळेल.
टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.