Shukra Gochar 2026 : शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश; मेषसह 'या' राशींचे चमकणार भाग्य, येणार 'अच्छे दिन'!

Shukra Gochar 2026 | १४ मे २०२६ शुक्र मिथुन राशीत गोचर करेल
Shukra Gochar 2026
Shukra Gochar 2026pudhari photo
Published on
Updated on

Shukra Gochar 2026

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, सुविधा, रोमान्स आणि ऐश्वर्याचा कारक मानले जाते. सध्या शुक्र वृषभ राशीत विराजमान आहे, मात्र लवकरच तो बुध देवाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. हिंदू पंचांगानुसार, १४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी शुक्र मिथुन राशीत गोचर करेल.शुक्र या राशीत ८ जूनपर्यंत राहणार आहे. मिथुन ही बुधाची राशी असल्याने, शुक्राचा या राशीतील प्रवेश बुद्धिमत्ता आणि सौंदर्याचा एक सुवर्णसंगम घडवून आणेल. शुक्राचे हे राशी परिवर्तन काही खास राशींसाठी 'अच्छे दिन' घेऊन येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी...

मेष राशीच्‍या जाताकांच्‍या आत्‍मविश्‍वासात होईल वाढ

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत सक्रिय असेल.तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल.जर तुम्ही मार्केटिंग, लेखन किंवा संवाद क्षेत्राशी संबंधित असाल, तर लोक तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील.भावंडांसोबतचे संबंध सुधारतील.लहान पण आनंददायी सहलींचे योग येतील, ज्यामुळे मन ताजेतवाने होईल.

Shukra Gochar 2026
Mars Jupiter Conjunction 2026 |मंगळ-गुरुची युती घडवणार कमाल! 'या' ४ राशींना धनलाभासह मिळणार प्रगतीची सुवर्णसंधी

मिथुन राशीच्‍या जातकांच्‍या व्यक्तिमत्वात येईल चमक

शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुम्ही आकर्षणाचे केंद्र बनाल.तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक येईल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.जर तुम्ही अविवाहित असाल, तर कोणातरी खास व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते.स्वतःवर पैसे खर्च कराल; जसे की नवीन कपडे, ग्रूमिंग किंवा एखादे गॅजेट खरेदी करणे.स्वतःला वेळ देण्याची आणि 'पॅम्पर' करण्याची हीच ती वेळ आहे.

Shukra Gochar 2026
Shukra Gochar 2026 | पुढील १२ दिवस 'या' राशींचे नशीब पालटणार! शुक्र-मंगळाच्या संयोगाने जुळून आला धनलाभाचा योग

सिंह राशीच्‍या जातकांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्‍याची शक्‍यता

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर तुमची झोळी सुखांनी भरणारे ठरेल.तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात.अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.मित्रांसोबत पार्टी आणि गेट-टुगेदरचे वातावरण राहील.सामाजिक वर्तुळात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते.

Shukra Gochar 2026
Rahu Nakshatra Gochar 2026 | कुंभ राशीतील राहुची चाल पालटणार 'या' ५ राशींचे नशीब; होणार सुखाचा वर्षाव!

कन्‍या राशीसाठी उत्तम काळ

कन्या राशीच्‍या जातकांच्‍या कामाच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे.ऑफिसमधील वातावरण आता तणावपूर्ण वाटणार नाही.करिअरमध्ये तुमच्या सर्जनशीलतेचे कौतुक होईल.वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारतील.जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये चांगला समतोल राहील.

Shukra Gochar 2026
Gajkesari Rajyog 2026 | १८ मे पासून 'गजकेसरी राजयोग'; वृषभसह 'या' ५ राशींचे नशीब उजळणार!

कुंभ राशीच्‍या जातकांसाठी गुंतवणूक ठरेल फायदेशीर

कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे मिथुन राशीतील आगमन आयुष्यात रोमान्स आणि सर्जनशीलता घेऊन येईल. कला, संगीत किंवा डिझायनिंग क्षेत्राशी संबंधित असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल.शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतून फायदा होण्याची अपेक्षा आहे.मुलांसोबत चांगला वेळ व्यतीत होईल आणि प्रेमसंबंधांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news