Mars Jupiter Conjunction 2026 |मंगळ-गुरुची युती घडवणार कमाल! 'या' ४ राशींना धनलाभासह मिळणार प्रगतीची सुवर्णसंधी

जेव्हा मंगळाच्या शक्तीला गुरूचे मार्गदर्शन मिळते, तेव्हा व्यक्ती योग्य दिशेने कार्य करते
Mars Jupiter Conjunction 2026
प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari
Published on
Updated on

Mars Jupiter Conjunction 2026

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा ऊर्जा आणि साहसाचा कारक मंगळ आणि ज्ञान तसेच भाग्याचा कारक गुरु एकमेकांपासून ६० अंशांच्या कोनात असतात, तेव्हा ज्योतिषशास्त्रात याला 'लाभ दृष्टी राजयोग' म्हटले जाते.ही एक अत्यंत शुभ आणि सकारात्मक स्थिती आहे, कारण यामुळे दोन मित्र ग्रहांमध्ये मैत्रीपूर्ण सहकार्य निर्माण होते. जेव्हा मंगळाच्या शक्तीला गुरूचे मार्गदर्शन मिळते, तेव्हा व्यक्ती योग्य दिशेने कार्य करते. जाणून घेवूया राजयोगाच्या प्रभावामुळे कोणत्‍या राशींना सर्वाधिक लाभ होईल...

मेष राशीच्‍या जातकांची रखडलेली कामे मार्गी लागतील

मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. गुरूशी होणारी ही युती तुमच्या रखडलेल्या कामांमध्ये नवचैतन्य फुंकणार आहे.लांब पल्ल्याचे प्रवास सुखद होतील आणि त्यातून आर्थिक लाभ मिळेल.नशिबाची साथ मिळाल्याने तुमचे निर्णय अचूक ठरतील.

Mars Jupiter Conjunction 2026
Gajkesari Rajyog 2026 | १८ मे पासून 'गजकेसरी राजयोग'; वृषभसह 'या' ५ राशींचे नशीब उजळणार!

धनु राशीच्‍या जातकांचा आत्‍मविश्‍वास वाढेल

'लाभ दृष्टी राजयोग'चा प्रभाव धनु राशीच्‍या जातकांवर सकारात्‍मक पडेल. गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. मंगळाशी होणारा ६० अंशांचा कोन तुम्हाला अधिक धाडसी आणि ऊर्जावान बनवेल.तुम्ही खेळाडू असाल किंवा सैन्य/पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी 'सुवर्णकाळ' ठरू शकतो.व्यवसायात नवीन गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

Mars Jupiter Conjunction 2026
Shukra Gochar 2026 | पुढील १२ दिवस 'या' राशींचे नशीब पालटणार! शुक्र-मंगळाच्या संयोगाने जुळून आला धनलाभाचा योग

सिंह राशीच्‍या जातकांना नोकरीत होईल लाभ

सिंह राशीसाठी मंगळ आणि गुरु हे दोन्ही परम मित्र ग्रह आहेत. 'लाभ दृष्टी राजयोग' तुमच्यातील सर्जनशील बाजूला अधिक मजबूत करेल.संतानाकडून आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील.नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा आणि पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात.

Mars Jupiter Conjunction 2026
Rahu Nakshatra Gochar 2026 | कुंभ राशीतील राहुची चाल पालटणार 'या' ५ राशींचे नशीब; होणार सुखाचा वर्षाव!

मिथुन राशीच्‍या जातकांना मिळेल प्रगतीची संधी

मिथुन राशीच्या लोकांसाठी नेटवर्किंग आणि प्रगतीची संधी मिळेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी ही वेळ नवीन लोकांशी जोडली जाण्याची आणि नेटवर्किंगची आहे. तुमच्या ओळखींमार्फत तुम्हाला एखादा नवे कामे मिळू शकते. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमचा सल्ला मानतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news