Premanand Maharaj : बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जावे का नाही? प्रेमानंद महाराजांनी सांगितला योग्य मार्ग

बाथरूममध्ये मोबाईल वपरणे योग्य की अयोग्य? प्रेमानंद महाराजांनी सांगितला योग्य नियम...
Premanand  Maharaj
Premanand Maharaj : बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जावे का नाही? प्रेमानंद महाराजांनी सांगितला योग्य मार्गfile photo
Published on
Updated on

Should one take a mobile phone into the bathroom? The right path told by Premanand Maharaj

पुढारी ऑनलाईन : आजच्या आधुनिक काळात मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक आपला फोन प्रत्येक ठिकाणी सोबत घेऊन जातात. अनेक जण बाथरूममध्येही मोबाईल वापरतात. पण बाथरूममध्ये मोबाईल नेणे योग्य आहे का? याबाबत संत Premanand Maharaj यांनी एकांतिक वार्तालापात मार्गदर्शन केले.

Premanand  Maharaj
Nanded News | अमृत सरोवर योजनेच्या नावाखाली गौण खनिज घोटाळा?

आजच्या काळात मोबाईलचा वापर सतत वाढत आहे. अनेक लोक मोबाईलमध्ये इतके गुंतून जातात की ते प्रत्येक क्षणी त्याचाच वापर करताना दिसतात. काही लोक स्नान करतानाही भजन किंवा गुरुंचे प्रवचन मोबाईलवर ऐकतात. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की बाथरूममध्ये मोबाईल नेणे योग्य आहे का?

दिल्लीतील एका युवकाने एकांतिक वार्तालापादरम्यान Premanand Maharaj यांना विचारले, “गुरुदेव, बाथरूममध्ये फोन घेऊन जाऊ शकतो का? त्यावर आपले प्रवचन ऐकू शकतो का?”

Premanand  Maharaj
Social Media Ban Under 16 | चिंता उमलत्या पिढीची!

यावर महाराज म्हणाले, “हो, तुम्ही बाथरूममध्ये फोन घेऊन जाऊ शकता. मात्र, त्याचा थेट वापर करू नये. तुम्हाला जे सत्संग किंवा प्रवचन ऐकायचे असेल ते आधीच सुरू करून ठेवा. त्यानंतर स्नान करून पवित्र झाल्यावरच फोन हातात घ्या. फोन एखाद्या उंच ठिकाणी ठेवावा आणि वारंवार स्पर्श करू नये.”

महाराज पुढे म्हणाले की, “फोन ही अशी वस्तू आहे जी आपण सर्व ठिकाणी घेऊन जातो. त्यामुळे पवित्रतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे बुद्धी शुद्ध राहते. आजकाल अनेक लोक शौचालयातसुद्धा मोबाईलचा वापर करत राहतात, जे अत्यंत चुकीचे आहे. फोन बाथरूममध्ये उंच जागी ठेवू शकता, पण त्याचा वापर पवित्र झाल्यानंतरच करावा.”

दरम्यान, Premanand Ji Maharaj यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्या पदयात्रेचे दर्शन काही काळासाठी बंद करण्यात आले आहे. यापूर्वी महाराज आपल्या निवासस्थानापासून पायी चालत कैली कुंज आश्रमात जात असत आणि भक्तांना मार्गात दर्शन देत असत. मात्र, सध्या त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी ही पदयात्रा थांबवण्यात आली असून आता भक्तांना रस्त्यावर त्यांचे दर्शन घेता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news