Parivartini Ekadashi: गणेशोत्सव आणि परिवर्तिनी एकादशीचा अद्भुत योग! आज विष्णू आणि बाप्पाची पुजा कशी करावी? अचूक वेळ आणि विधी

भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी आज परिवर्तिनी एकादशी (पद्मा एकादशी किंवा जयंती एकादशी) म्हणून साजरी केली जात आहे.
Lord Vishnu Vaman avatar, shree ganesh
Lord Vishnu Vaman avatar, shree ganeshFile Photo
Published on
Updated on

Parivartini Ekadashi 2026

भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी आज परिवर्तिनी एकादशी (पद्मा एकादशी किंवा जयंती एकादशी) म्हणून साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या पवित्र दिवशी श्रीविष्णूंच्या वामन रूपाची विधिवत पूजा करण्याचे आणि उपवास ठेवण्याचे विशेष महत्त्व असून, यामुळे सर्व पापांचे क्षय होऊन मोक्षाचा मार्ग सुकर होतो.

शुभ मुहूर्त आणि उपास सोडण्याची वेळ

पंचांगानुसार, परिवर्तिनी एकादशी तिथीची सुरुवात काल रात्री ८ वाजता झाली असून, या तिथीची सांगता आज रात्री ९ वाजून ४३ मिनिटांनी होईल. उपास सोडण्याची वेळ उद्या म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी सकाळी ६:१० ते सकाळी ८:३५ वाजेपर्यंत असेल. या निर्धारित वेळेतच उपवास सोडावा.

Lord Vishnu Vaman avatar, shree ganesh
Lord Ganesha female form: गणपतीचे स्त्रीरूप पाहिलंय का? कोण आहेत देवी विनायकी? महाराष्ट्रातही आहे एकमेव मंदिर

गणेशोत्सवाचा योग आणि वामन पूजन

विशेष म्हणजे, यंदा परिवर्तिनी एकादशी गणेशोत्सवाच्या धामधुमीत आली आहे. त्यामुळे या दिवशी श्रीविष्णूंसोबतच विघ्नहर्ता बाप्पाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. या दोन्ही देवतांच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, विद्या आणि बुद्धीची प्राप्ती होते.

व्रताचे महत्त्व

धार्मिक विश्वासानुसार, परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने अनावधानाने घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. संतती सुख, धन-समृद्धी आणि भौतिक उन्नतीची इच्छा असणाऱ्यांसाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले गेले आहे. आजच्या दिवशी श्रद्धा आणि नियमांचे पालन करून विष्णू-गणेशाची आराधना करण्याचे आवाहन शास्त्रामध्ये करण्यात आले आहे.

Lord Vishnu Vaman avatar, shree ganesh
Astrology: दिवाळीपूर्वी ६ राशींचे नशीब पालटणार; बुध आणि शुक्र चालणार उलटी चाल; पाहा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

टीप: धार्मिक परंपरा आणि उपलब्ध माहितीच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news