Lord Ganesha female form: गणपतीचे स्त्रीरूप पाहिलंय का? कोण आहेत देवी विनायकी? महाराष्ट्रातही आहे एकमेव मंदिर

धार्मिक ग्रंथांमध्ये गणेशाच्या विविध रूपांचे वर्णन आढळते. असेच एक अद्वितीय रूप म्हणजे देवी विनायकी, ज्यांना गणेशाचे स्त्री-रूप मानले जाते. जाणून घ्या विनायकी रूप कसे प्रकट झाले? आणि पौराणिक कथा काय आहे?
Vinayaki Lord Ganesha female form
Vinayaki Lord Ganesha female formFile Photo
Published on
Updated on

Lord Ganesha female form

नवी दिल्ली : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने होते. गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि शुभतेचे देवता मानले जातात. धार्मिक ग्रंथांमध्ये गणेशाच्या विविध रूपांचे वर्णन आढळते. असेच एक अद्वितीय रूप म्हणजे देवी विनायकी, ज्यांना गणेशाचे स्त्री-रूप मानले जाते. देवी विनायकीशी संबंधित काही खास मान्यता असून, भारतातील काही प्राचीन मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्ती आणि शिल्पे पाहायला मिळतात.

देवी विनायकी कोण-कोणत्या नावांनी ओळखतात?

श्री गणेशाच्या या स्त्रीरूपाला वेगवेगळ्या ठिकाणी विविध नावांनी ओळखले जाते. विनायकी, गणेशानी, गणेश्वरी आणि गजाननी अशी त्यांची नावे प्रचलित आहेत. दिसण्यात देवी विनायकीचे रूप गणेशासारखेच असते, मात्र, त्यांचे शरीर स्त्रीरूपात दाखवले जाते. मान्यतांनुसार, त्यांना शक्ती आणि गणेश यांच्या संमिश्र रूपाचे प्रतीक मानले जाते. भारतातील काही प्राचीन मंदिरांमध्ये या अनोख्या देवीच्या मूर्ती पाहायला मिळतात.

Vinayaki Lord Ganesha female form
Jaipur Moti Dungri Temple: गणपतीला वाहतात मेहंदी अन् वर्षभरात जुळतो विवाह; भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिराचा  अनोखा इतिहास

राजस्थानपासून दक्षिण भारतापर्यंत आढळतात मूर्ती

राजस्थानमधील खेड येथे देवी विनायकीची एक प्राचीन मूर्ती आहे. ही मूर्ती अतिशय जुनी असल्याचे मानले जाते. याशिवाय ओडिशातील हिरापूर येथील ६४ योगिनी मंदिरातही देवी विनायकीचे रूप पाहायला मिळते. हे मंदिर प्राचीन योगिनींच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतातही देवी विनायकीच्या पूजेच्या परंपरेचे पुरावे आढळतात. तामिळनाडूमधील कन्याकुमारी परिसरात असलेल्या थानुमालयन मंदिरात देवी विनायकीचे प्राचीन शिल्प आहे. हे मंदिर सुमारे १३०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.

महाराष्ट्रातही आहे एकमेव स्त्रीरूपातील गणपतीचे मंदिर

महाराष्ट्रात एकमेव असे मंदिर आहे, जिथे स्त्रीरूपातील गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. पुणे शहरापासून सुमारे ५४ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. भुलेश्वर शिव मंदिर या नावाने हे मंदिर ओळखले जाते. विलक्षण वास्तुकलेसाठीही भुलेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.

मंदिरात स्त्रीरूपातील गणपतीची मूर्ती असून, या रूपाला गणेश्वरी, लंबोदरी किंवा गणेशयानी अशा नावांनी ओळखले जाते. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे बांधण्यात आली. त्याच काळात हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या गर्भगृहात पाच शिवलिंगे आहेत.

देवी विनायकीची पौराणिक कथा काय आहे?

देवी विनायकीशी संबंधित एका पौराणिक कथेत अंधक नावाच्या राक्षसाचा उल्लेख आढळतो. मान्यतेनुसार, अंधकाला माता पार्वतीशी विवाह करायचा होता. माता पार्वतीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी अंधकावर हल्ला केला. कथेनुसार, अंधकाच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्यातून आणखी एक राक्षस निर्माण होत असे. त्यामुळे अंधकाची शक्ती वाढत जात होती. ही परिस्थिती पाहून देवी-देवतांनी आपल्या शक्तींचे आवाहन केले.

विनायकी रूप कसे प्रकट झाले?

देवी-देवतांच्या शक्तींमधून अनेक मातृशक्ती प्रकट झाल्या. त्यानंतर भगवान शिव आणि अंधक यांच्यात युद्ध झाले. गणेशानेही स्त्री-रूपात (मातृशक्तीच्या रूपात) प्रकट होऊन अंधकाचा सामना केला. पौराणिक कथेनुसार, मान्यतेनुसार, गणेशांनी अंधकाचा वध केला आणि त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडू दिले नाहीत. याच घटनेतून देवी विनायकीच्या रूपाला महत्त्व प्राप्त झाले; तिला भगवान गणेशाची स्त्री-शक्ती किंवा स्त्री-रूप मानले जाते. याच कारणामुळे, काही विशिष्ट प्रदेशांत देवी विनायकीची श्रद्धेने पूजा केली जाते.

देवी विनायकीचे रूप कसं असते?

देवी विनायकीच्या मूर्तीमध्ये भगवान गणेशांशी साधर्म्य असलेली अनेक प्रतीके दिसतात. हत्तीचे मुख आणि स्त्रीचे शरीर असे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रूप आहे. त्यामुळे देवी विनायकीचे स्वरूप अत्यंत अनोखे मानले जाते. देवी विनायकीशी संबंधित श्रद्धा या भारताच्या प्राचीन धार्मिक आणि शाक्त परंपरांमधील विविधता दर्शवतात.

Vinayaki Lord Ganesha female form
Premanand Maharaj: नाव आणि पैसा कमवायचा आहे? प्रेमानंद महाराजांनी सांगितले भाग्य बदलण्याचे २ उपाय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news