

Astrology Budh Shukra Vakri:
मुंबई: यंदा ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यापूर्वीच आकाशात ग्रहांच्या चालित मोठा बदल पाहायला मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात संपत्ती, वैभव आणि बुद्धीचे कारक असणारे बुध आणि शुक्र हे दोन्ही प्रमुख ग्रह वक्री (उल्टी चाल) चालणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धी, वाणी, व्यापार आणि संवादाचा कारक मानला जातो, तर शुक्र हा सुख-सुविधा, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो. या दोन्ही ग्रहांच्या वक्री स्थितीमुळे वेगवेगळ्या राशींवर संमिश्र प्रभाव पडणार असून काही राशींसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, शुक्र ३ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वक्री राहील, तर बुध २४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२६ या काळात वक्री अवस्थेत असेल. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे वक्री होणे म्हणजे ते खरोखर मागे चालणे नसून, पृथ्वीवरून पाहताना त्यांची गती बदलल्यासारखी भासते. या कालावधीत जुन्या कामांचा आढावा घेणे, रखडलेले विषय मार्गी लागणे आणि काही गोष्टींमध्ये विलंब होणे यांसारख्या स्थिती निर्माण होतात.
मेष: मेष राशीच्या व्यक्तींसाठी बुधाची वक्री गती व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल मानली जाते. व्यापारात गुंतलेल्यांना नफ्याच्या संधी मिळू शकतात. आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची तुमची क्षमता फायदेशीर ठरू शकते. जुन्या संपर्कांमुळेही कामे यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकतात.
कर्क: नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ फलदायी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. मात्र, कोणताही मोठा निर्णय घेताना प्रत्येक पैलूचा सखोल विचार करणे हिताचे राहील.
वृश्चिक: कामकाजात प्रगती करण्याच्या उत्तम संधी चालून येतील. रखडलेले प्रकल्प पुन्हा गतिमान होतील आणि भूतकाळात केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे पाहायला मिळेल.
मिथुन: या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे या बदलाचा विशेष प्रभाव राहील. करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील, परंतु मानसिक ताण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या गोष्टींवर जास्त विचार करणे टाळावे.
वृषभ: या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते; त्यामुळे, शिस्तबद्ध दिनचर्या पाळणे फायदेशीर ठरेल.
मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपली मुले आणि कुटुंबाशी संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात येऊन कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. नातेसंबंधांच्या बाबतीत, घाईघाईने कृती करण्याऐवजी संवादातून मार्ग काढणे अधिक चांगले ठरेल.
कन्या : शुक्राची वक्री चाल कन्या राशीच्या व्यक्तींसाठी काही बाबतीत दिलासा देणारी ठरू शकते. विशेषतः ३ ऑक्टोबरनंतर भाग्याची साथ मिळण्याचे संकेत दिले जात आहेत. जुनी कामे पूर्ण होण्यासोबतच नवीन संधीही समोर येऊ शकतात.
तूळ : शुक्र तूळ राशीत वक्री होणार असल्याने या राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे ज्योतिषीय संकेत आहेत. विशेषतः आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य दिनचर्या, पुरेशी विश्रांती आणि आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.
मकर : मकर राशीच्या व्यक्तींनी या काळात कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे. एकाच वेळी अनेक कामे हाती घेण्याऐवजी प्राधान्यक्रम निश्चित करून पुढे जाणे योग्य ठरेल. कामातील छोटी चूकही अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे प्रत्येक काम पुन्हा तपासून पाहणे फायदेशीर ठरेल.
कुंभ : कुंभ राशीसाठी शुक्राची वक्री चाल असताना भाग्याची साथ काहीशी कमी मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे केवळ नशिबावर अवलंबून न राहता मेहनत आणि योग्य नियोजनावर भर देणे चांगले राहील. गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेताना घाई टाळणे हिताचे ठरेल.
दिवाळीचा संबंध धन, सुख-समृद्धी आणि नवीन कामांच्या सुरुवातीशी जोडला जातो. त्यामुळे दिवाळीच्या काही दिवस आधी बुध आणि शुक्राच्या स्थितीत होणारा बदल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, ग्रहांच्या स्थितीचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे वरील अंदाज हे सर्वसाधारण ज्योतिषीय संकेत म्हणून पाहणे योग्य ठरेल.