Navaratri 2026 Maha Ashtami: नवरात्रीमधील महाष्टमीला निर्माण होणारा 'समसप्तक योग' नेमका काय आहे; कोणाला होणार याचा फायदा?

गृहांच्या स्थितीनुसार गुरू आणि चंद्र यांच्यात समसप्तक योग निर्माण होण्याची शक्यता आहे.
Navaratri 2026 Maha Ashtami
Navaratri 2026 Maha Ashtamipudhari
Published on: 
Updated on: 

Navaratri 2026 Maha Ashtami: शारदीय नवरात्र उत्सवात यंदाच्या महाष्टमीला ज्योतिष शास्त्रानुसार एक खास योग निर्माण होत आहे. त्यामुळं यंदाची नवरात्र मधील महाष्टमी ही अनेकांसाठी लाभदायक ठरणार आहे. गृहांच्या स्थितीनुसार गुरू आणि चंद्र यांच्यात समसप्तक योग निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग काही राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडणार आहे. त्यामुळं करिअरमध्ये फायदा, आर्थिक स्थिती सुधारणे आणि अडकलेली कामे पूर्ण होण्याची संधी मिळणार आहे.

Navaratri 2026 Maha Ashtami
Navaratri Festival : रांगोळीतून साकारली देवीची प्रतिकृती; आठ तासांचे परिश्रम

काय असतो समसप्तक योग?

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ज्यावेळी दोन ग्रह एकमेकांच्या सातव्या स्थानात येतात. त्यावेळी त्यांच्यामध्ये समसप्तक योग निर्माण होतो. गुरू हा ग्रह ज्ञान, भाग्य आणि शिक्षण, वृद्धीचा प्रतिक मानला गेला आहे. तर चंद्र हा मन, भावना आणि मानसिक स्थितीशी निगडीत आहे. ज्योतिष मान्यतेनसुार हे दोन ग्रह समसप्तक संबंध काही लोकांसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो.

Navaratri 2026 Maha Ashtami
Pathardi Shakambhari Navaratri: श्री मोहटादेवी गडावर शांकभरी नवरात्रोत्सव भक्तिभावात पार पडला

१ धनु रास

धनु राशीचा संबंध गुरु ग्रहाशी मानला जातो. त्यामुळे गुरुशी संबंधित ज्योतिषीय योग या राशीसाठी विशेष महत्त्व ठेवून असतात. विद्यार्थी दशमेत असलेल्यांना अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची संधी मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायात नवीन शक्यतेवर विचार केला जाऊ शकतो. आर्थिक बाबींमध्ये भविष्याची आखणी करण्यासाठी आणि बचतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

Navaratri 2026 Maha Ashtami
Navaratri 2025 | सोन्सुरे येथे उभारलेले अष्टभुजाधारी देवी दुर्गामातेचे लक्षवेधी वाळूशिल्प !

२ मेष रास

मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ करिअर आणि वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते. एखाद्या जुन्या प्रकल्पात यश मिळण्याची किंवा नवीन जबाबदारी मिलनेची शक्यता राहू शकते. आर्थिक बाबींमध्येही स्थिती सुधारण्याचे उत्तम योग येऊ शकतात. मात्र, घाईघाईने कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा.

Navaratri 2026 Maha Ashtami
Navaratri 2024 | मुंबईकरांचे श्रद्धास्थान महालक्ष्मी देवी

३ सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग आत्मविश्वासात आणि कामकाजमधील सक्रियतेत वाढ करणारा मानला जाऊ शकतो. नोकरदार वर्गाला उच्चाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्क प्रस्थापित करण्याच्या किंवा आपल्या योजना पुढे नेण्याच्या संधी मिळू शकतात. कुटुंबात सकारात्मक वातावरण ठेवल्यामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा येऊ शकतो. आपल्या योजना यशस्वी करण्यासाठी मेहनत आणि संयम बाळगा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news