

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोन्सुरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी नवरात्रीचे औचित्य साधून सोन्सुरे येथे सुंदर असे अष्टभुजाधारी देवी दुर्गा मातेचे वाळूशिल्प साकारले आहे.
वाळू शिल्पकार रविराज चिपकर हे अनेक वेळा वेगवेगळ्या विषयांवर वाळूशिल्प साकारत असतात. त्यांची वाळूशिल्प पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. नवरात्रीनिमित्त त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सुंदर असे दुर्गा मातेचे वाळूशिल्प साकारले आहे. हे वाळू शिल्प साकारण्यासाठी त्यांना तब्बल दहा तास लागले. वाळूशिल्प पाहताना त्यांच्या कलेवरील प्रेम दिसून येते. आजच्या दुर्गा मातेच्या वाळू शिल्पातील छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी बारकाईने सजविल्या आहेत.