

Mangal Kuldeepak Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २८ सप्टेंबरला मंगळ ग्रह ‘कुलदीपक राजयोग’ तयार करणार आहे. यामुळे तीन राशींच्या व्यक्तींना अनेक क्षेत्रांत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. चला, या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट काळानंतर राशी बदलतो. या बदलाचा परिणाम १२ राशींवर तसेच जगभरात दिसून येतो. सध्या, ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह तुळ राशीत आहे. त्याचे बल सध्या थोडे कमकुवत असले, तरी २८ ला त्याचे अंश बल ९ अंशांपर्यंत पोहोचेल. यामुळे मंगळ ‘दिग्बली’ होऊन आपली उच्च राशी असलेल्या मकरमध्ये ‘कुलदीपक राजयोग’ तयार करणार आहे. या योगामुळे काही राशींना विशेष फायदा होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाच्या स्थितीमुळे ‘कुलदीपक राजयोग’ तयार होतो. जेव्हा मंगळ दहाव्या स्थानी उच्च राशीत किंवा स्वतःच्या राशीत असतो, तेव्हा हा राजयोग तयार होतो. सध्या मंगळ तुळ राशीत आहे आणि मकर राशीत दहाव्या स्थानात आहे, जी त्याची उच्च रास मानली जाते. या योगाचा प्रभाव प्रचंड वाढणार आहे. या राजयोगामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतित करता येतात.
मंगळ ग्रह निर्माण करत असलेला ‘कुलदीपक राजयोग’ मकर राशीला लाभ होणार आहे. या राशीच्या जातकांना करिअरमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील. नवीन नोकरीतील अडथळे दूर होऊन चांगल्या संधी मिळतील. बढतीसह वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊन भविष्यासाठी बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचा ‘कुलदीपक राजयोग’ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. मंगळ या राशीचा स्वामी आहे आणि सातव्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे कामातील अनेक अडथळे दूर होतील. नोकरदारांच्या आयुष्यातील समस्या संपुष्टात येतील. तुम्हाला थोडा दबाव जाणवू शकतो; परंतु त्यातूनच चांगल्या संधी निर्माण होतील. व्यवसायात तुम्ही आखलेली रणनीती यशस्वी ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, मात्र खर्चही वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.
कर्क राशीच्या जातकांसाठी ‘कुलदीपक राजयोग’ लाभदायक ठरेल. या राशीच्या चौथ्या स्थानी मंगळ विराजमान आहे. नोकरीच्या क्षेत्रात चांगला प्रभाव दिसून येईल. तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल, ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रसन्न होतील. तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातही तुमची मेहनत आणि समर्पण लाभदायक ठरेल. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धकांवर मात कराल. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि भविष्यासाठी बचतही करू शकाल. तुमचे आरोग्य उत्तम राहील.
टीप : वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित सामान्य माहिती देतो. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.