Shani Nakshatra Gochar : शनी कृपेने ३ ऑक्टोबरपासून 'या' राशींच्या जीवनात सुरू होणार आनंददायी काळ

गुरुच्या नक्षत्रातील प्रवेशामुळे काही राशींच्या जातकांसाठी प्रत्येक क्षेत्रात लाभदायक स्‍थिती
Shani Nakshatra Gochar
प्रातिनिधिक छायाचित्र. Flie Photo
Published on
Updated on

Shani Nakshatra Gochar : ज्योतिषशास्त्रात कर्मफलदाता अशी ओळख असणार्‍या शनी ग्रह वेळोवेळी आपल्या नक्षत्रात बदल करत राहतात. याचा परिणाम मेष पासून मीन अशा सर्व १२ राशींवर होतो. शनी ग्रह ऑक्टोबरमध्ये आपल्या नक्षत्रात बदल करणार आहेत. शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींच्या जीवनात आनंददायी काळ सुरू होईल. जाणून घेवूय शनीचे नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे याविषयी...

३ ऑक्‍टोबरला शनि करणार शनी पूर्वभाद्रपद नक्षत्रात गोचर

३ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी रात्री ९:४९ वाजता शनी पूर्वभाद्रपद नक्षत्रात गोचर करतील. पूर्वभाद्रपद नक्षत्राचे स्वामी गुरु ग्रह आहे. गुरुच्या नक्षत्रात शनीच्या जाण्यामुळे काही राशींच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात लाभ होऊ शकतो आणि अडचणींमधून सुटका मिळण्याची शक्यता आहे.

Shani Nakshatra Gochar
Rainy Season and Nakshatra | पावसाळी नक्षत्रे आणि वरुणराजा...एक अतुट नातंच...
Shani Nakshatra Gochar
मिथुन AI Photo

मिथुन राशीच्‍या जातकांना अचानक आर्थिक लाभ शक्‍य

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल राहणार आहे. या काळात नोकरीच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते. करिअरमध्ये महत्त्वपूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक मान-प्रतिष्ठा वाढेल.

Shani Nakshatra Gochar
मृग नक्षत्रात तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ
Shani Nakshatra Gochar
तूळ AI Photo

तूळ राशीच्‍या जातकांच्‍या आर्थिक स्‍थितीत होणार सुधारणा

तूळ राशीच्‍या व्यक्तींसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन शुभ ठरणार आहे. या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. गुंतवणुकीसाठी चांगले संधी समोर येऊ शकतात. काहींसाठी कामाच्या निमित्ताने परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. कर्जातून सुटका मिळण्याची शक्यता आहे.

Shani Nakshatra Gochar
Monsoon 2025 | ७ नक्षत्र... ७ शनिवार... पावसाचं ‘परफेक्ट टाइमिंग’ यंदा विशेष
Shani Nakshatra Gochar
कुंभ AI Photo

कुंभच्‍या जातकांना व्यवसाय विस्ताराची संधी

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगतीसह उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यावसायिकांसाठी विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील. जमीन, इमारत आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news