

ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्धी आणि व्यापाराचा कारक मानला जाणारा बुध ग्रह सुमारे ३० दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या बदलाचा परिणाम व्यापार, शेअर बाजार, अर्थव्यवस्था आणि इतर अनेक क्षेत्रांवर प्रामुख्याने दिसून येतो. बुध ग्रह ऑक्टोबर महिन्यात तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तूळ ही शुक्राची रास मानली जाते. बुधाच्या या गोचरामुळे काही विशिष्ट राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा धनलाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच, शेअर बाजारआणि लॉटरीतूनही फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी...
बुध ग्रहाचे राशी परिवर्तन कर्क राशीसाठी अत्यंत अनुकूल ठरु शकते. बुध ग्रह कर्क राशीत चतुर्थ स्थानी भ्रमण करेल. त्यामुळे या राशीच्या जातकांच्या भौतिक सुखांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. रिअल इस्टेट, मालमत्ता किंवा जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असणार्यांसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरू शकतो.संवाद कौशल्य आणि बौद्धिक क्षमतेच्या जोरावर इतरांवर प्रभाव टाकू शकाल. नवीन योजना सुरू करण्यासाठी, लेखन किंवा सादरीकरण करण्यासाठी आणि सामाजिक संबंध दृढ करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.
बुध ग्रहाचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरू शकते. कारण कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. तो तुमच्या राशीच्या धन स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे.या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक आणि आर्थिक यश लाभेल. मित्र आणि सहकाऱ्यांच्या मदतीने मोठे फायदे मिळतील. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. आपल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा काळ उत्तम आहे. संवाद कौशल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल.
कुंभ राशीच्या जातकांसाठी बुध ग्रहाचे गोचर लाभदायक ठरू शकते.हे राशी परिवर्तन तुमच्या राशीच्या भाग्य स्थानी होणार आहे, ज्यामुळे या काळात तुमचं भाग्य उजळू शकतं.तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होऊ शकता. करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील.कामासंदर्भात छोटा किंवा मोठा प्रवास घडू शकतो.कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्जनशीलतेचे आणि नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या किंवा बढतीची संधी मिळू शकते.या काळात तुमच्या मनात असलेल्या योजना यशस्वी होतील.