Mangal Gochar 2025 : ग्रहांचा 'सेनापती' निर्माण करणार 'रुचक राजयोग', 'या' राशींसाठी बदलणार नशिबाचा 'खेळ'

ज्योतिषशास्त्रानुसार, २७ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून, त्याचे संक्रमण पाच राशींसाठी विशेष लाभदायक ठरेल
Mangal Gochar 2025
प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhri Photo
Published on
Updated on

Mars Transit 2025 in Scorpio: ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. हाच मंगळ ग्रह आता २७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २:४४ वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करेल. मंगळाचे स्व-राशीत होणारे संक्रमण एक शक्तिशाली रुचक राजयोग निर्माण करेल. वृश्चिकसह पाच राशींना या संक्रमणाचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. या राशींच्या जातकांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. चला जाणून घेऊया, मंगळाच्या संक्रमणाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव होईल या विषयी...

Gemini
मिथुनfile photo

मिथुन : मौल्यवान वस्तूची खरेदी

मिथुन राशीसाठी मंगळ त्यांच्या सहाव्या घरात भ्रमण करेल. या काळात एखादी मौल्यवान वस्तू खरेदीचा योग निर्माण होत आहे. हे संक्रमण मिथुन राशीच्‍या जातकांसाठी आनंद आणि समृद्धी देईल. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. हे संक्रमण तुमच्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर ठरेल. आरोग्‍य उत्तम राहिल. तुम्ही प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. प्रतिष्ठेत वाढ होईल. उत्पन्न देखील लक्षणीय वाढू शकते.

Mangal Gochar 2025
बुध ग्रहावरून आलेल्या दोन उल्कांचा शोध
Virgo
कन्या file photo

कन्या : आत्मविश्वास वाढवेल

मंगळ कन्या राशीच्या तिसऱ्या घरात भ्रमण करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, तिसऱ्या घरात मंगळ संक्रमण खूप शुभ मानले जाते. कन्‍या राशीच्‍या जातकांना याचे सकारात्मक परिणाम मिळतील. आत्मविश्वासात वाढ होईल. आत्मविश्वासाने केलेल्या कृतींमुळे तुम्हाला लक्षणीय आर्थिक लाभ होतील. शत्रूंवर विजय मिळवाल. एखादी चांगली बातमी मिळू शकते. नशिबाची साथ लाभेल.

Mangal Gochar 2025
Guru Purnima 2025 Donations | जाणून घ्या, गुरु पौर्णिमेला कोणत्या राशीने काय दान करावे
Scorpio
वृश्चिक file photo

वृश्चिक : नकारात्‍मक प्रभाव कमी होईल

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी, मंगळ तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करत आहे. पहिल्या घरात मंगळाचे भ्रमण शुभ मानले जात नसले तरी, तुमच्या राशीवर गुरुचा प्रभाव मंगळाच्या नकारात्मक प्रभावांना कमी करेल. विचारपूर्वक केलेल्‍या कृतीतून यश मिळेल. कोणतीही गोष्‍ट संयमाने पूर्ण केली पाहिजेत. तसेच आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल.

Mangal Gochar 2025
Shani Pradosh Vrat 2025 |4 ऑक्टोबरला महायोग! शनि प्रदोष व्रत, शनी महादशा आणि साडेसातीतून मुक्तीसाठी करा हे 3 उपाय
Capricorn
मकर file photo

मकर : निकटवर्तींयांचा पाठिंबा लाभेल

मंगळ मकर राशीच्या लोकांसाठी लाभाच्या घरातून भ्रमण करत आहे. या घरात मंगळाची स्थिती खूप अनुकूल मानली जाते. हे संक्रमण तुमचे उत्पन्न वाढवणारे ठरेल;पण तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळेल. मंगळाचे संक्रमण नोकरी करणाऱ्यांसाठी करिअरच्या नवीन संधी आणेल. तुमच्या भावंडांशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील. तुमच्या जवळच्या लोकांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांकडूनही तुम्हाला लक्षणीय फायदा होऊ शकतो.

Mangal Gochar 2025
बुध ग्रहाच्या पोटात हिर्‍यांचा जाड स्तर
Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : सुज्ञपणे काम पूर्ण कराल

मीन राशीच्या भाग्यस्थानात मंगळाचे संक्रमण होईल. हे संक्रमण मिश्रित परिणाम आणेल. तुमच्या राशीचा स्वामी गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही तुमची सर्व कामे अत्यंत हुशारीने पूर्ण कराल. तुमच्या कामातून चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सल्ला दिला जातो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्वीसारखीच साथ मिळत राहील. कोणत्याही वादात अडकू नका, असा सल्ला दिला जातो. तुम्हाला पाठीशी संबंधित काही समस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

टीप : वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित सामान्य माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news