World War 3 India : तिसरे विश्वयुद्ध होणार का? भारत जिंकणार की हारणार? 16 व्या शतकातच लिहिले आहे भारताचे युद्धातील भवितव्य

world war 3 : 16 व्या शतकात संत अच्युतानंददास यांनी भविष्यमालिका नावाच्या पुस्तकात कलियुगाचा अंत आणि पृथ्वीच्या विनाशाची भविष्यवाणी लिहिली
Representative Image
Word war 3Pudhari
Published on
Updated on

Saint Achyutanand :

16 व्या शतकात संत अच्युतानंददास यांनी भविष्यमालिका नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात कलियुगाचा अंत आणि पृथ्वीच्या विनाशाची भविष्यवाणी लिहिली आहे. पण त्यांच्या जास्त भविष्यवाणी या ओडिशातील प्रसिद्ध अशा जगन्नाथ मंदिराबाबत होत्या. अच्युतानंददास हे स्वत: ओडिशाचे राहणारे असल्याने त्यांच्या जास्तीतजास्त भविष्यवाणी या मंदिराबाबत असल्याचे दिसून येते.

याशिवाय यावेळी जगन्नाथ मंदिराबाबत असलेले गुढतेचे वलय त्यात अजून भर टाकत असे. तसेच हे मंदिर त्याकाळी अनेक राजकीय सामाजिक घडामोडींचे केंद्रस्थान होते.

याचवेळी त्यांनी केलेल्या पृथ्वीच्या विनाशाच्या भविष्यवाणीबाबत आजही अनेक तर्क वितर्क मांडले जातात. आजपर्यंत पृथ्वीच्या अंताबाबत आणि भारताच्या भवितव्याबाबत अनेक आंतरराष्ट्रीय भविष्यवेत्त्यांनीही बरेच काही लिहून ठेवले आहे. जाणून घेऊया संत अच्युतानंददास यांच्या भविष्यवाणीमध्ये काय दडले आहे?

Representative Image
Viral : फोन ठेवताना एम्प्लॉयी क्लायंटला अचानक I Love You म्हणाला अन्.. मिळाला असा रिप्लाय की...

आकाशात 2 सूर्य दिसतील

संत अच्युतानंददास आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हणतात, कलयुग त्याच्या ऐन भरात असताना आकाशात दोन सूर्य दिसू लागतील. पण दूसरा प्रकाश सूर्याचा नसेल तर पृथ्वीच्या अत्यंत जवळ एक उल्कापिंड येईल जो लांबून पाहताना सूर्याचा भ्रम निर्माण करेल. कालांतराने हा पिंड बंगालच्या उपसागरात पडेल. ज्यामुळे ओडिशासह इतर आसपासची शहरे जलमय होऊन जातील.

नैसर्गिक आपत्तीने पृथ्वी झाकोळून जाईल

संत अच्युतानंददास आपल्या पुढच्या भविष्यवाणीमध्ये म्हणतात, पृथ्वीवर एकामागे एक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे अंधारून येईल. कुठे भूकंप येईल तर कुठे वादळ सुरू होईल. हा अंधार पृथ्वीवर जवळपास सात दिवसांपर्यंत राहील.

Representative Image
Viral : लग्नात डिजेने वाजवले ' चन्ना मेरेया' ; पठ्ठयाने एक्सच्या आठवणीत स्वत:चे लग्नच मोडले

विश्वयुद्धाला होणार सुरुवात

संत अच्युतानंददास यांनी 16 व्या शतकातच तिसऱ्या विश्वयुद्धाची भविष्यवाणी केली होती. ते लिहितात की जग तिसऱ्या विश्वयुद्धाचा सामना करेल. या युद्धात भारत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावेल. कलीयुगाच्या शेवटाच्याआधी काही वेळ सुरू होईल. हे तिसरे विश्वयुद्ध सहा वर्ष आणि सहा महीने इतका वेळ चालेल. चीन आणि इतर इस्लामिक देश भारतावर आक्रमण करतील. भारत या दोन्ही शत्रूविरोधात ठामपणे उभा राहील आणि हे युद्ध जिंकेल. यावेळी जगासमोर भारताची प्रतिमा विश्वगुरु म्हणून उभी राहील.

धरतीची ठिकाणे बदलतील

संत अच्युतानंददास यांच्या भविष्यवाणीनुसार कलियुगाच्या अंतादरम्यान पृथ्वीवर इतके भूकंप येतील की जमीन आपली जागा सोडेल. खंड आणि समुद्र यांच्या जागा बदलतील. पृथ्वीवरील ठिकाणे पूर्वीसारखी राहणार नाहीत त्यात बदल होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news