Hanuman Jayanti 2026: अकबराचा छळ अन् ४० दिवस कैद... तुलसीदास यांनी कशी लिहिली हुनमान चालीसा?

Hanuman Jayanti 2026
Hanuman Jayanti 2026pudhari
Published on
Updated on

Hanuman Jayanti 2026: संपूर्ण देशभरात आज २ एप्रील २०२६ रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. हनुमान जयंतीला रामचरीतमानस आणि हनुमान चालीसा या पवित्र धार्मिक ग्रंधांचे पठण कलें जातं. याशिवाय हनुमान जयंती पूर्ण होऊ शकत नाही. या दिवशी हनुमानाचे भक्तगण हे हनुमान चालीसाचे पठण करत असतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की महान कवी तुलसीदास यांनी ही हनुमान चालीसा कशी रचली असेल. चला तर मग आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमा चालीसा कशी रचली गेली याबाबत माहिती जाणून घेऊयात...

Hanuman Jayanti 2026
Jamsavli Hanuman Lok |मध्यप्रदेश–महाराष्ट्र सीमेवरचे जामसावळी ‘हनुमान लोक’: भाविकांना आकर्षित करणारे श्रद्धास्थान

अकबराच्या जलेमध्ये रचली हनुमान चालीसा

लोक मान्यतांनुसार हनुमान चालीसा लिहिण्याची प्रेरणा कवी तुलसीदास यांना मुघल सम्राट अकबराच्या कैदेत असताना मिळाली. असं म्हणतात की एकदा अकबराने तुलसीदास यांना आपल्या दरबारात बोलावलं आणि त्यांना तुमच्या लेखनाचा चमत्कार दाखवण्यास सांगितलं. मात्र तुलसीदास यांनी विनम्र होऊन त्यांना नकार दिला. नकार ऐकून अकबराने तुलसीदास यांना तुरूंगात डांबण्याचे आदेश दिले.

Hanuman Jayanti 2026
Hanuman Jayanti 2026: हनुमान जन्मोत्सवाचा खास योग; पाहा पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथीची वेळ

अकबराच्या कैदेतून बाहेर येण्याचा कोणताच मार्ग तुलसीदास यांना दिसत नव्हता. अशा संकट काळात आपल्याला आता श्री हनुमानच वाचवू शकतात. शेवटी ते संकटमोचक आहेत. त्यानंतर तुलसीदास यांनी हनुमान चालीसा लिहिण्याचा संकल्पन केला. तुलसीदासने पूर्ण ४० दिवस भक्तीभावाने हनुमान चालीसाची रचना केली. त्यांनी स्वतः देखील याचे पाठ केले.

Hanuman Jayanti 2026
Hanuman Jayanti | गोड नवसाची अनोखी परंपरा : ‘पेढ्या मारुती’; ठाणेकरांचे श्रद्धास्थान

वानरांचा अचानक हल्ला अन्...

असं सांगतात की हनुमान चालीसा पूर्ण होताच ४० व्या दिवशी अचानक वानरांनी अकबराच्या दरबारात हल्ला केला. त्यामुळे अकबराच्या महालाचे आणि परिसराचे मोठे नुकासान झाले. त्यानंतर अकबराला जाणवलं की तुलसीदासमध्ये नक्कीच कोणती तरी दिव्य शक्ती आहे. त्याने त्वरित आपल्या सैनिकांना तुलसीदास यांना तुरूंगातून सोडून देण्याचे आदेश दिले.

Hanuman Jayanti 2026
Hanuman Jayanti | 'खाली डोके, वर पाय' मूर्ती असणारा 'पाण्यातील मारुती': नवसाला पावणारा म्हणून पंचक्रोशीत ओळख

कोण होते तुलसीदास?

गोस्वामी तुलसीदास यांचा जन्म १५३२ मध्ये उत्तर प्रदेशातील राजापूर गावात झाला होता. लहन असताना त्यांचे नाव रामबोला होते. मात्र एका घटनेनं त्यांचं पूर्ण जीवन बदलून गेलं. त्यानंतर ते भगवान श्रीरामांचे आणि हनुमानांचे सर्वात मोठे भक्त झाले. तिथूनच त्यांची आध्यात्मिक यात्रा सुरू झाली. ज्यावेळी त्यांनी वराह क्षेत्रातील राम कथेबाबत ऐकलं त्यावेळी त्यांनी आपल्या संसारिक जीवनाचा त्याग केला. ते संत मार्गाला लागले. त्यानंतर त्यांनी रामचरितमानस आणि हनुमान चालीसा या पवित्र ग्रंथांची निर्मिती केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news