Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला निवडावे लागतात 'हे' ३ मार्ग; गरुड पुराणानुसार तुमचे कर्म तुम्हाला कुठे नेणार?

गरुड पुराणानुसार शरीर सोडल्यानंतर आत्म्याला ३ मार्गांनी जावे लागते, परंतु तुम्हाला माहित आहे की ते तीन मार्ग कोणते आणि कर्मांनुसार आत्मा कुठे पोहोचतो?
Garuda Purana
Garuda PuranaAI Photo
Published on
Updated on

Garuda Purana

नवी दिल्ली: गरुड पुराण हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा धर्मग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये मृत्यू, परलोक आणि मानवी कर्मांच्या फळांचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. गरुड पुराणात मृत्यूच्या वेळी माणसाचे काय होते आणि आत्मा कसा निघून जातो याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.

गरुड पुराणानुसार माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळते. माणसाच्या मृत्यूनंतर शरीर इथेच राहते आणि आत्मा बाहेर पडून कर्मानुसार पुढे प्रवास करतो. शरीर सोडल्यानंतर आत्म्याला ३ मार्गांनी जावे लागते, परंतु तुम्हाला माहित आहे की ते तीन मार्ग कोणते आणि कर्मांनुसार आत्मा कुठे पोहोचतो?

Garuda Purana
Garuda Purana: हिंदू धर्मात अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? गरुड पुराणानुसार यामागचे कारण

१. अर्चि मार्ग (देवयान मार्ग)

गरुड पुराणानुसार या मार्गाला देवयान मार्ग असेही म्हणतात. हा प्रकाश, ज्ञान आणि देवांचा मार्ग मानला जातो. व्यक्तींनी आयुष्यभरात निस्वार्थ वृत्तीने कार्य केले आहे आणि अध्यात्माचे पालन केले आहे, त्यांच्या आत्म्याचा प्रवास या मार्गाने होतो. गरुड पुराणात सांगितले आहे की आर्ची मार्गाने आत्मा थेट ब्रह्मलोकात जातो, ज्याद्वारे आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते.

२. धूम मार्ग (पितृयान मार्ग)

धूम मार्गाला 'पितृयान मार्ग' म्हणून ओळखले जाते. या मार्गाने ज्यांनी आपल्या जीवनात सत्कर्म, परोपकार आणि धार्मिक कार्य केले आहेत ते आत्मे जातात. असे मानले जाते की, या मार्गाने गेलेले आत्मे स्वर्गात किंवा पितृलोकात आपल्या पुण्याचे फळ भोगतात. मात्र, पुण्याचा साठा संपल्यानंतर या आत्म्यांना पुन्हा मृत्युलोकात (पृथ्वीवर) जन्म घ्यावा लागतो.

३. उत्पत्ति-विनाश मार्ग (नरक लोक)

गरुड पुराणात सांगितले आहे की, हा मार्ग अत्यंत कष्टदायी आणि भयानक मानला जातो. आयुष्यात वाईट कृत्ये आणि पाप कर्म करणाऱ्या आत्म्यांना या मार्गाने जावे लागते. या प्रवासात आत्म्याला अत्यंत क्लेशकारक मानली जाणारी 'वैतरणी नदी' पार करावी लागते. पापी आत्म्यांसाठी हा प्रवास अत्यंत तीव्र वेदनांचा असतो; तर चांगल्या कर्मांच्या आत्म्यांना ही नदी सहजरीत्या पार करता येते.

टीप: या लेखातील माहिती सामान्य धार्मिक मान्यता, गरुड पुराण आणि पारंपरिक कथांवर आधारित आहे. हा मजकूर केवळ माहितीच्या उद्देशाने प्रसिद्ध करण्यात आला असून आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.

Garuda Purana
Garuda Purana: मृत्यूच्या ठीक ५ मिनिटे आधी माणसाला काय दिसतं? गरुड पुराणातील 'हे' सत्य वाचून अंगावर काटा येईल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news