May 2026 Horoscope | मे महिन्यात ४ ग्रहांचे महागोचर, 'या' ३ राशी ठरणार सर्वाधिक लकी!

May 2026 Horoscope | मंगळ ग्रहाचे स्‍वराशीत आणि 'बुधादित्य योग' निर्माण करणार नवीन संधी
May 2026 Horoscope | मे महिन्यात ४ ग्रहांचे महागोचर, 'या' ३ राशी ठरणार सर्वाधिक लकी!
Published on
Updated on

मुंबई : मे २०२६ हा महिना ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात एकामागोमाग एक अशा ४ ग्रहांचे राशी परिवर्तन होणार असून, काही ग्रहांचा अस्त होणार आहे, तर काही ग्रहांचा उदय होणार आहे.. ग्रहांच्या या महागोचरमुळे काही राशींना संपूर्ण महिनाभर नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे.

सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार

सूर्य गोचर: ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. मे महिन्यात सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. यामुळे सरकारी लाभ, आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि सामाजिक सन्मानात वाढ होईल.

May 2026 Horoscope | मे महिन्यात ४ ग्रहांचे महागोचर, 'या' ३ राशी ठरणार सर्वाधिक लकी!
बुध ग्रहावरून आलेल्या दोन उल्कांचा शोध

मंगळ ग्रह करणार स्‍वराशीत प्रवेश आणि 'बुधादित्य योग'ही

मंगल देव मे महिन्यात स्वराशीत प्रवेश करतील. विशेष म्हणजे या महिन्यात मंगळाचा उदयही होणार आहे. तर शुक्र १४ मे रोजी राशी परिवर्तन करून मिथुन राशीत प्रवेश करेल. १ मे २०२६ रोजी बुध ग्रह अस्त होईल आणि १५ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल. सूर्यासोबत बुधाची युती झाल्याने 'बुधादित्य योग' तयार होईल, जो निर्णयक्षमता सुधारण्यास आणि प्रगतीच्या नवीन संधी मिळवून देण्यास मदत करेल.

May 2026 Horoscope | मे महिन्यात ४ ग्रहांचे महागोचर, 'या' ३ राशी ठरणार सर्वाधिक लकी!
आता चक्क तोफेने उपग्रह झेपावणार अंतराळात!
मेष
मेष AI Photo

मेष राशीच्‍या जातकांचा आत्‍मविश्‍वास वाढणार

मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना आत्मविश्वास आणि लाभ घेऊन येत आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. मंगळाचे तुमच्या राशीत आगमन झाल्यामुळे आणि सूर्याच्या शुभ प्रभावामुळे ऊर्जेत वाढ होईल आणि तुमची सर्व प्रलंबित कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.

वृषभ
वृषभAI Photo

वृषभ राशीच्‍या जातकांना मिळणार आनंदाची बातमी

वृषभ राशीसाठी मे महिना धन-संपत्तीच्या दृष्टीने आनंदाची बातमी घेऊन येईल. ग्रहांच्या विशेष संयोगामुळे नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत उत्पन्नाचे स्रोत वाढतील. वैयक्तिक आयुष्यातही आनंदाचे क्षण येतील. या काळात घेतलेले ठोस निर्णय तुमच्या भविष्यातील नियोजनासाठी फायदेशीर ठरतील.

वृश्चिक
वृश्चिक AI Photo

वृश्चिक राशीचे जातक अनुभवतील मानसिक शांतता

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या महिन्यात मानसिक शांतता लाभेल. जर तुम्ही गेल्या काही काळापासून भावनिकदृष्ट्या त्रस्त असाल, तर तो त्रास आता कमी होईल. आर्थिक समस्यांची गुंतागुंत सुटेल आणि परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊन तणाव कमी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news