

Hanuman Jayanti 2026: हिंदू पंचांगात चैत्र महिन्याला खूप महत्व आहे. हा काळ नवी सुरूवात. भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असतो. या महिन्यात नवरात्री, राम नवमी आणि हनुमान जयंती यासारखे मोठे सण साजरे केले जातात. हनुमान जयंतीचा दिवस भगवान हनुमान यांनी समर्पित केलेला असतो. यंदाची हनुमान जयंती ही २ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी लोकं मंदिरात जाऊन श्री हनुमानाचे दर्शन घेतात. आपल्या जीवनातील अडचणी दूर करा अशी प्रार्थना करतात.
मान्यतेनुसार भगवान हनुमान यांच्या बाल रूपातील पूजा करण्याने दुःख आणि वेदना कमी होतात. हनुमान यांना कलयुगातील सर्वात जागृत देवता मानलं गेलं आहे. हनुमान हे आपल्या भक्ताच्या प्रत्येक अडचणीत मदत करायला येतात. हनुमान जयंतीला काही विशिष्ट वस्तू घरात आणण्यामुळं घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाची वृद्धी होते.
भगवान हनुमानाला शेंदूर अत्यंत प्रिय आहे. धार्मिक मान्यतेनुसार, शेंदूर हे त्यांच्याप्रती असलेले प्रेम, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. जे भक्त खऱ्या मनाने त्यांना शेंदूर अर्पण करतात, त्यांच्यावर हनुमानजींची विशेष कृपा राहते. हनुमान जयंतीला शेंदूर घरी आणणे आणि देवाला अर्पण करणे सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन आर्थिक अडचणी कमी होतात.
जर घरात वास्तू दोष किंवा ग्रहांची पीडा जाणवत असेल, तर हनुमान जयंतीला तांब्याची छोटी कुऱ्हाड आणणे शुभ मानले जाते. तांबा ही धातू शुद्ध आणि ऊर्जा संतुलित करणारी असते. या कुऱ्हाडीची पूजा करून ती घराच्या पवित्र ठिकाणी ठेवल्यास आजूबाजूच्या नकारात्मक शक्ती कमी होतात आणि घरातील वातावरण शांत व संतुलित बनते.
भगवान हनुमानाला वानर रूपात दर्शवले जाते, जे त्यांच्या अफाट शक्ती, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक आहे. त्यांचे हे रूप साहस, निष्ठा आणि सेवाभावाचे दर्शन घडवते. घरात हनुमानजींचे वानर रूपातील चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शुभ फळे मिळतात.
गदा हे हनुमानजींच्या शक्तीचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. हे केवळ एक अस्त्र नसून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे संकेत देते. ज्याप्रमाणे हनुमानजी आपल्या गदेने नकारात्मक शक्तींचा नाश करतात, त्याचप्रमाणे घरात गदा ठेवल्याने सुरक्षा आणि सकारात्मकता वाढते. हनुमान जयंतीला गदा आणून तिची विधिवत पूजा करावी आणि ती घराच्या पूर्व दिशेला ठेवावी. यामुळे घरातील भीती आणि अशांती दूर होण्यास मदत होते.