Makar Sankranti Rajyog 2026: १४ जानेवारीला दोन ग्रहांची 'राजयोग' गट्टी... 'या' तीन राशींचा पगार, पद अन् मानसन्मानही दणकून वाढणार

ज्योतिष शास्त्रासार मकर संक्रांतीच्या आधी एक दिवस दिवस शुक्र देखील मकर राशीत प्रवेश करतोय
Makar Sankranti Rajyog 2026
Makar Sankranti Rajyog 2026pudhari photo
Published on
Updated on

Makar Sankranti Rajyog 2026: यंदाची मकर संक्रांत ही १४ जानेवारी रोजी येणार आहे. बुधवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात ही मकर संक्रांत साजरी केली जाईल. या दिवशी सूर्यदेव धनू राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतोय. म्हणूनच त्याला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो.

ज्योतिष शास्त्रासार मकर संक्रांतीच्या आधी एक दिवस दिवस शुक्र देखील मकर राशीत प्रवेश करतोय यामुळं १४ जानेवारीला सूर्य आणि शुक्र या दोन ग्रहांची मकर राशीत युती होत आहे. सूर्य आणि शुक्र यांच्या या दुर्मिळ युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार होत आहे.

Makar Sankranti Rajyog 2026
राशिभविष्य (दि.२६ फेब्रुवारी २०२२)

शास्त्रानुसार हा राजयोग अत्यंत शुभ मानला गेला आहे. मान्यतेनुसार हा राजयोग ज्या कोणाच्या जातक कुंडलीत तयार होत आहे त्यांचा चांगला काळ सुरू होत आहे. त्यांना पैसा, संपत्ती यांची प्राप्ती होणे सुरू होईल. चला तर मग जाणून घेऊयात शुक्रादित्य राजयोगाचा कोणत्या कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

Makar Sankranti Rajyog 2026
Surya Rashi Parivartan : मकर संक्रांतीपासून मिळणार नशीबाची साथ! सूर्याचे राशी परिवर्तन 'या' ४ राशींसाठी विशेष लाभदायक!
Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष राशी

शुक्रादित्य राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी शुभसंकेत घेऊन येऊ शकतो. हा योग काम आणि व्यवहार यांच्याशी जोडल्या जाणाऱ्या स्थानावर निर्माण होणार आहे. त्यामुळं करिअरमध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन अन् वेतनवाढची शक्यता निर्माण होईल. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. प्रतिष्ठा वाढणार आहे.

व्यापाऱ्यांसाठी नवीन डील अन् फायदा मिळवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. यावेळी वडिलांसोबतचे संबंध देखील आधीपेक्षा चांगले राहतील.

Makar Sankranti Rajyog 2026
Horoscope 12 January 2025: नोकरी, पैसा, आरोग्य आणि प्रेमाबाबत काय आहे ग्रहांची स्थिती? वाचा १२ राशींचे भविष्य
Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांना शुक्रादित्य राजयोग चांगला परिणाम देणारा ठरणार आहे. हा योग तुमच्या कुंडलीत भाग्याशी संबंधित स्थानावर निर्माण होत आहे. त्यामुळे नशीबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. कष्टाचे चांगले फळ मिळेल. उत्पन्नाचे नवे रस्ते निर्माण होतील. घरातील कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. कमाच्या किंवा व्यापाराच्या संदर्भात प्रवास घडतील.

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर राशी

शुक्रादित्य राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी एक सकारात्मक बदल घेऊन येईल. हा राजयोग आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. अनेक दिवसांपासून खोळंबलेली कामे पुढे सरकतील. पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्थिती सुधारेल.

नोकरी करणाऱ्या लोकांना वढती मिळण्याची शक्यात आहे. तर व्यापार करणाऱ्यांसाठी देखील हा राजयोग लाभदायक ठरणार आहे. घरातील वातावरण सुखद राहील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. जोडीदारीची प्रगती होईल. समाजात मान अन् सन्मान वाढेल. लग्नाळू लोकांसाठी लग्नासाठी नवे प्रस्ताव येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news