Vastu Tips: या ३ गोष्टींमुळे घरात कलह निर्माण होतो, आजच बदल करा

पुढारी वृत्तसेवा

घरात शांतता आणि आनंद हवा असतो, पण कधी कधी विनाकारण वातावरण जड वाटू लागते.

छोट्या कारणांवरून वाद वाढतात आणि मन अस्वस्थ राहते.

वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू आणि त्यांची चुकीची मांडणी नकारात्मकता वाढवू शकते.

वेळेत बदल न केल्यास घरातील अडचणी वाढू शकतात.

1) बंद पडलेली घड्याळ ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ घरात ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे प्रगती थांबते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते.

घड्याळ दुरुस्त होऊ शकत असेल तर त्वरित दुरुस्ती करा. पूर्णपणे खराब असल्यास घराबाहेर काढणेच योग्य.

2) तुटलेला आरसा ठेवू नका

तुटलेला आरसा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. घरात जास्त काळ ठेवल्यास मानसिक अस्वस्थता वाढू शकते. शक्य तितक्या लवकर तुटलेला आरसा घरातून हटवा.

3) मुख्य दरवाज्याजवळ पसारा टाळा

मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. चप्पल-जोडे विखुरलेले ठेवले तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. शू-रॅकमध्ये व्यवस्थित ठेवणे अधिक योग्य.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.