Petrol Diesel Price: निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर 25 ते 28 रुपयांनी वाढणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण

Petrol Diesel Price Hike: पश्चिम आशियातील तणावामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या चर्चांना जोर आला आहे. 25 ते 28 रुपये दरवाढ होणार असल्याच्या बातम्यांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
Petrol Diesel Price Hike
Petrol Diesel Price HikePudhari
Published on
Updated on

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात निवडणुका संपताच तब्बल 25 ते 28 रुपयांची वाढ होणार असल्याच्या चर्चेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील तणाव यामुळे इंधन दरवाढीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र केंद्र सरकारने या सर्व बातम्यांना फेटाळून लावत त्या “फेक न्यूज” असल्याचे स्पष्ट केले आहे.

अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या संघर्षाचा परिणाम जागतिक तेल बाजारावर दिसून येत आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हा समुद्री मार्ग जगातील जवळपास 20 टक्के तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीपैकी सुमारे 40 टक्के आयात याच मार्गातून होते.

Petrol Diesel Price Hike
Gold Silver Price Crash: सोनं-चांदीत मोठी घसरण! एका दिवसात चांदी 6 हजारांनी स्वस्त; सोन्याचे भावही कोसळले

ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने दिलेल्या अंदाजानुसार, जर पश्चिम आशियात शांतता करार झाला नाही आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढत राहिल्या, तर राज्यातील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरात मोठी वाढ होऊ शकते. या अहवालानुसार, जर इंडियन बास्केटमधील कच्च्या तेलाचा दर 120 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेला, तर पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 25 ते 28 रुपयांनी वाढू शकतात.

दरम्यान, इराण आणि अमेरिकेमधील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची मुदत वाढवली असली तरी दोन्ही देशांमधील मतभेद कायम आहेत. काही वृत्तांनुसार, इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरात काही व्यापारी जहाजांवर गोळीबार केला आणि काही जहाजे ताब्यात घेतल्याचा दावा केला. त्यामुळे जागतिक तेल पुरवठ्याबाबत चिंता अधिकच वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत अफवा पसरू लागल्या. मात्र पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत अशा बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे स्पष्ट केले.

Petrol Diesel Price Hike
77 Runs in One Over: 1 ओव्हरमध्ये 77 धावा... 17 नो-बॉल, 8 सिक्स आणि 6 चौकार; बॅटींगचा भयानक थरार

मंत्रालयाने म्हटले की, सरकारच्या विचाराधीन पेट्रोल-डिझेल दरवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. गेल्या चार वर्षांत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीचा भार सामान्य नागरिकांवर पडू नये यासाठी सरकार आणि तेल कंपन्या सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

सध्या तरी पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत कोणताही अधिकृत निर्णय नसला, तरी जागतिक परिस्थितीमुळे तेल बाजारावर दबाव कायम आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news