

Indian Stock Market: भारतीय शेअर मार्केटसाठी गुरूवारचा दिवस महत्वाचा दिवस ठणार आहे. परदेशातील काही घटनांचा थेट परिणाम आपल्या बाजारावर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा थेट संबंध हा अमेरिकेत घेतल्या गेलेल्या दोन निर्णयांशी आहे. या निर्णयामुळे भारताचे टेन्शन वाढलं आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर शेअर मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसात तेजी दिसली होती. आता ती धोक्यात आली आहे.
शेअर मार्केट गेल्या काही दिवसांपासून सतत रेड झोनमध्ये होता. सध्याच्या आठवड्यात बीएसई आणि निफ्टी ५० इंडेक्स जवळपास २ टक्क्यांनी पडला होता. गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शेअर मार्केटने आपली चाल बदलली होती. सेन्सेक्स आणि निफ्टीत थोडी तेजी आली होती. त्यामुळं गुंतवणूकदारांना मोठा दिसाला मिळाला होता. मात्र आता हा दिलासा तातपुरता असल्याचे दिसून येत आहे.
युएस फेड रिजर्वने पॉलिसी रेट हाईकची घोषणा केली आहे. केविन वॉर्श यांच्या नेतृत्वात झालेल्या फेडच्या बैठकीत व्याज दरात २५ बेसिस पॉईंट अर्थात ०.२५ टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर अमेरिकेच्या फेडरल फंड्स रेट ३.७५ टक्क्यावरून ४ टक्के पोहचला आहे.
दुसरं मोठं कारण म्हणजे अमेरिकेच्या सिनेटने रशियावर नव्याने सँक्शन लावण्याच्या बिलाला मंजूरी दिली आहे. यामुळं भारताला मोठा टेन्शन मिळालं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा अधिकार देण्याची देखील तरतूद आहे. भारत हा रशियाकडून तेल आयात करणाऱ्या सर्वात मोठा देशांमध्ये सामील आहे.
शेअर बाजारात भूकंप येण्याचा तिसरा संकेत म्हणजे अमेरिकेचा शेअर बाजारापासून सेंसेक्स - निफ्टीसाठी मुख्य संकेत मानले जाणारे गिफ्ट निफ्टीकडून मिळत आहे. खरं तर अमेरिकेच व्याज दरांची वाढ होण्याच्या वृत्ताने गेल्या दिवशी Dow Jones क्रॅश होणार आहे. १.२१ टक्के अर्थात ६३१ अंकांनी खाली आला. तर गिफ्ट निफ्टी गुरूवारी सुरूवातीपासूनच रेड झोनमध्ये दिसत आहे. त्यामुळं याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होणार असल्याचे तगडे संकेत मिळत आहेत.