Donald Trump and EVM : २०२८ च्या अमेरिकन निवडणुकीत भारतीय EVM वापरण्याची ट्रम्प यांची योजना? सत्य काय जाणून घ्या!

सोशल मिडीयावरील पोस्टने चर्चेला उधाण, खरी गोष्ट वेगळीच
Donald Trump and EVM
Donald Trump and EVM
Published on
Updated on

Donald Trump and EVM अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक ट्रूथ सोशल या सोशल मिडीया हँडलवरील एक स्क्रिन शॉट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच ते २०२८ मध्ये अमेरिकेतील निवडणूकीत भारताची इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) प्रणाली वापरणार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प भारतीय निवडणूक आयोगाशी चर्चा करत असल्याचा दावाही केला जात आहे. पण याची सत्‍यता पडताळली असता हा दावा पूर्णपणे फेक असल्याचे समोर आले आहे.

काय आहे व्हायरल दावा?

सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका स्क्रीनशॉटमध्ये असा दावा केला जात आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी भारतीय EVM बाबत गंभीर चर्चा केली आहे. या पोस्टमध्ये भारतीय EVM ला ‘१००% सुरक्षित’ असे म्हटले असून २०२८ च्या यूएस निवडणुकीत त्यांचा वापर केला जाईल, असे ट्रम्प यांच्या नावाने दाखवण्यात आले आहे.

Donald Trump and EVM
Donald Trump: 'आपण भारताकडून शिकलं पाहिजे'; डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्ञानेश कुमारांचं नाव घेत निवडणूक आयोगाचं केलं कौतुक

सत्‍य काय आहे ?

अधिकृत विधानाचा अभाव: "डोनाल्ड ट्रम्प", "EVM", "भारतीय EVM" आणि "२०२८ यूएस इलेक्शन्स" यांसारख्या कीवर्ड्सच्या साहाय्याने शोध घेतला असता, अमेरिकन प्रशासनाने भारतीय EVM वापरण्याचा विचार केल्याचा कोणताही अधिकृत अहवाल किंवा सरकारी निवेदन आढळले नाही. व्हायरल स्क्रीनशॉट ज्या 'ट्रुथ सोशल' खात्याचा असल्याचे सांगितले जात आहे, त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत खात्यावर अशी कोणतीही पोस्ट आढळलेली नाही.

ज्ञानेश कुमार यांचे केले कौतुक

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भातील एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी केवळ भारताच्या निवडणूक प्रणालीतील 'मतदार ओळखपत्र' (voter ID) नियमांचा उल्लेख केला होता. वैध फोटो आयडीशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जाऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या मूळ पोस्टमध्ये EVM बाबत कोणताही उल्लेख नव्हता. त्‍यामुळे सोशल मिडीयावर होत असलेला अमेरिकेची निवडणूक EVM मशीनद्वारे होणार या दाव्यात कोणतेही तथ्य नाही हे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news