Truck Driver: ट्रक ड्रायव्हरने युट्यूबवरून पैसे कमवून घेतला 40 लाखांचा ट्रक; सोशल मीडियावर मिळाली नवी ओळख

Truck Driver Success Story: झारखंडच्या हजारीबागमधील ट्रक चालक पंकज मद्धेशियाने यूट्यूबवर व्हिडिओ बनवत मोठी कमाई केली. सोशल मीडियामुळे त्याला नवी ओळख मिळाली आणि आता त्याने 40 लाखांचा ट्रक विकत घेतला आहे.
Truck Driver Success Story
Truck Driver Success StoryPudhari
Published on
Updated on

Truck Driver YouTube Income Story: डिजिटल युगात कमाई करण्याचे मार्ग बदलत आहेत. पूर्वी नोकरी, व्यवसाय किंवा शेती हेच कमाईचे मुख्य स्त्रोत मानले जायचे. पण आता मोबाईल आणि इंटरनेटमुळे अनेकांना स्वतःची वेगळी ओळख तयार करता येते. झारखंडमधील एका ट्रक चालकाने यूट्यूबवर व्हिडिओ बनवत चक्क 40 लाखांचा नवा ट्रक खरेदी केला आहे.

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील पंकज मद्धेशिया हे पेशाने ट्रक चालक आहेत. ट्रक चालवतानाच त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला व्हिडिओ बनवणे हा केवळ वेळ घालवण्याचा किंवा आवडीचा भाग होता. पण हळूहळू त्यांच्या व्हिडिओंना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्यातून त्यांची कमाईही होऊ लागली. आज त्याच कमाईच्या जोरावर पंकजने स्वतःसाठी 40 लाख रुपयांचा ट्रक घेतला आहे.

Truck Driver Success Story
Maharashtra Municipal Election Results live| सोलापूर महापालिका : भाजपची 22 जागांवर, शिंदे शिवसेना 3, काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर

पंकजला इथपर्यंत पोहोचायला खूप संघर्ष करावा लागला. त्यांनी 2007 मध्ये ट्रक हेल्पर म्हणून काम सुरू केलं होतं. तेव्हा त्यांना महिन्याला साधारण 6 हजार रुपये पगार मिळायचा. पुढे त्यांनी ट्रक चालवायला शिकून चालकाची जबाबदारी घेतली आणि पगार 12 हजारांपर्यंत वाढला. 2017 पर्यंत त्यांना 18 हजार रुपयांपर्यंत पगार मिळत होता. दरम्यान त्यांचं लग्न झालं, मुलं झाली आणि घरखर्च वाढू लागला. त्यामुळे त्यांनी पुढे ट्रेलर वाहन घेतलं आणि काम वाढवण्याचा प्रयत्न केला.

आर्थिक स्थिती थोडी सावरतेय, असं वाटत असतानाच कोरोना काळात लॉकडाउन सुरु झालं. कामधंदे ठप्प झाले होते. पण पंकजसाठी हाच काळ टर्निंग पॉईंट ठरला. लॉकडाउनच्या दिवसांत तो ब्लॉग आणि व्हिडिओ पाहायचा. तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला, आपणही असाच कंटेंट बनवू शकतो.

Truck Driver Success Story
BMC Election 2026 Result Live Update: पहिल्या कलांमध्ये भाजप-शिंदे युतीने आघाडी घेतल्याचे दिसत आहे

यातूनच 2023 मध्ये त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली. ट्रक चालकाचं रोजचं जगणं, रस्त्यावरचे अनुभव, प्रवासातील गोष्टी त्यांनी सांगायाला सुरुवात केली, हे सगळं लोकांना आवडू लागलं. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर दीड लाखांहून अधिक सब्स्क्राइबर्स आहेत. तर फेसबुकवरही दोन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

पंकजचा हा प्रवास सोशल मीडियामुळे मिळालेल्या नव्या संधीचं उदाहरण आहे. आज टॅलेंट आणि सातत्य असेल, तर कोणत्याही क्षेत्रातील माणूस आपली ओळख निर्माण करू शकतो आणि त्यातून चांगली कमाईही करू शकतो, हे पंकजने आपल्या मेहनतीतून दाखवून दिलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news