Tata Group: विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेटपटूंना टाटांकडून खास गिफ्ट; Sierra SUV देणार भेट

Tata Sierra Gift Indian Women Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विश्वविजयानंतर टाटा मोटर्सने संघातील प्रत्येक खेळाडूला नवी Tata Sierra SUV भेट देण्याची घोषणा केली आहे.
Tata Sierra Gift Indian Women Cricket Team
Tata Sierra Gift Indian Women Cricket TeamPudhari
Published on
Updated on

Indian Women Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष देशभर साजरा होत असताना, टाटा मोटर्सने या विजेत्या खेळाडूंना एक खास भेट दिली आहे. कंपनीने जाहीर केले की, भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला नवी ‘Tata Sierra’ SUV भेट दिली जाणार आहे.

भारतीय संघाचा ऐतिहासिक विश्वविजय

2 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. हा क्षण भारतीय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला. कारण भारताने प्रथमच महिला विश्वचषक जिंकला. या विजयात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.

टाटा मोटर्सची घोषणा, प्रत्येक खेळाडूसाठी ‘Sierra’ SUV

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्र यांनी सांगितले की, “भारतीय महिला संघाने दाखवलेला आत्मविश्वास आणि निर्धार संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. या विजेत्या खेळाडूंना आम्ही ‘Tata Sierra’ SUV भेट देऊन त्यांच्या कामगिरीला सलाम करतो.”

Tata Sierra Gift Indian Women Cricket Team
Virat Kohli: 'किंग' कोहली आहे 11 कंपन्यांचा मालक; इथून करतो क्रिकेटपेक्षा जास्त कमाई

कंपनीने सांगितले की, संघातील प्रत्येक सदस्याला SUV चे टॉप मॉडेल भेट दिले जाणार आहे. ही गाडी 25 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकृतपणे लॉन्च होणार असून, विजेत्या संघाला Sierra च्या पहिल्या बॅचमधील गाड्या दिल्या जातील.

नव्या Tata Sierraचे वैशिष्ट्ये

1990च्या दशकातील भारताच्या ऑटोमोबाईल इतिहासात ‘Tata Sierra’ हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. ती देशातील पहिली ‘लाइफस्टाइल SUV’ होती. तीन दशकांनंतर टाटा मोटर्स ही गाडी पुन्हा आधुनिक रूपात आणत आहे.

Sierra मध्ये स्कल्प्टेड बोनट, शार्प कट लाइन्स आणि फ्रंटवर ‘SIERRA’ अशी आकर्षक नेमप्लेट आहे. LED लाइट बार, ब्लॅक्ड ग्रिल, ड्युअल टोन अलॉय व्हील्स आणि खास रॅप-अराउंड ग्लास डिझाइनमुळे गाडीचा लुक प्रीमियम दिसत आहे.

Tata Sierra Gift Indian Women Cricket Team
Gold Price Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण; चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

किंमत आणि बाजारातील स्पर्धा

अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नसली तरी Tata Sierra ची किंमत ₹13.50 लाख ते ₹24 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. भारतीय बाजारात तिची स्पर्धा Mahindra Thar Roxx, MG Hector आणि Scorpio-N सारख्या SUV सोबत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news