

Virat Kohli Business Empire Explained:
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली 5 नोव्हेंबरला 37 वर्षांचा झाला. मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर त्याने केवळ क्रिकेट जगतातच नव्हे तर व्यवसाय क्षेत्रातही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जगभरातील लाखो चाहत्यांसाठी प्रेरणास्थान असलेला कोहली आज भारताच्या सर्वाधिक यशस्वी क्रिकेटर्सपैकी एक आहे.
पूर्व भारतीय कर्णधार म्हणून इतिहास घडवणाऱ्या कोहलीने आता दोन फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली असून सध्या एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र मैदानाबाहेर तो ययशस्वी उद्योजकही आहे.
विराट कोहलीने गेल्या काही वर्षांत मोठा व्यावसायिक पोर्टफोलिओ तयार केला आहे. फूड, स्पोर्ट्स, ऑनलाइन रिटेल, लाइफस्टाइल आणि टेक्नॉलॉजी, अशा विविध क्षेत्रांमध्ये त्याने आपली गुंतवणूक केली आहे. ‘प्रायव्हेट सर्कल’च्या आकडेवारीनुसार, कोहलीने ज्या मोठ्या क्षेत्रांमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत, त्यावर एक नजर टाकूया.
2017 मध्ये कोहलीने पॅशन हॉस्पिटॅलिटी या कंपनीत गुंतवणूक करत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पदार्पण केले. याच कंपनीमार्फत त्याची लोकप्रिय ‘One8 Commune’ रेस्टॉरंट चेन चालवली जाते. याशिवाय, त्याने Ocean Drinks आणि Blue Tribe Foods (पॅकेज्ड फूड कंपनी) मध्ये गुंतवणूक केली आहे.
कोहलीने Sixth Sense Venture Capital आणि इतर दोन गुंतवणूकदारांसह Swmabhan Commerce Pvt Ltd मध्ये सुमारे 19 कोटी रुपये गुंतवले आहेत. ही कंपनी ‘Rage Coffee’ नावाने झटपट फ्लेवर्ड कॉफी विकते.
मे 2025 मध्ये कोहलीने World Bowling League मध्ये गुंतवणूक केली. याआधी त्याने Galactus Funware Technologies या मूळ कंपनीमार्फत Mobile Premier League (MPL) मध्ये भागीदारी केली होती.
याशिवाय ISL क्लब FC Goa मध्ये त्याने गुंतवणूक केली आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये त्याने सुमारे 3 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. वर्षअखेर ही गुंतवणूक वाढवून 35 कोटी रुपये झाली.
WROGN आणि Agilitas Sports या दोन कंपन्यांमध्ये कोहलीने मोठी गुंतवणूक केली आहे.
2020 मध्ये WROGN मध्ये त्याने 20 कोटी रुपये गुंतवले, तर ऑक्टोबर 2024 मध्ये Agilitas Sports Footwear कंपनीत तीन गुंतवणूकदारांसह 58 कोटी रुपये गुंतवले.
कोहलीने Koo App मध्ये सप्टेंबर 2021 मध्ये 0.01% हिस्सेदारीसाठी गुंतवणूक केली होती. त्या वेळी कंपनीचे मूल्यांकन सुमारे 800-850 कोटी रुपये इतके होते. मात्र जुलै 2024 मध्ये कंपनीने आपले ऑपरेशन बंद केले.
फेब्रुवारी 2020 मध्ये कोहलीने TVS Capital सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांसह Go Digit Insurance मध्ये गुंतवणूक केली होती. हीच कंपनी मे 2024 मध्ये IPO लॉन्च करत चर्चेत आली होती.