Gold Price Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण; चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Gold Rate Today: देशात सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली असून, 24 कॅरेट सोनं दिल्लीमध्ये ₹ 1,21,620 प्रति 10 ग्रॅमवर आलं आहे. 22 कॅरेट सोनं आणि चांदीचे भाव दोन्हीही कमी झाले आहेत.
Gold Rate Today
Gold Rate TodayPudhari
Published on
Updated on

Gold Rate Today: देशातील सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. आज 6 नोव्हेंबरला दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून ₹1,21,620 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचे भाव देखील कमी झाले असून, चांदीच्या भावातही घसरण सुरूच आहे.

चला पाहूया देशातील प्रमुख शहरांतील आजचे भाव

दिल्लीत सोन्याचे भाव

राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,21,620 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 1,11,490 प्रति 10 ग्रॅम आहे. आज सलग चौथ्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.

मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यातील भाव

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या तीनही प्रमुख बाजारपेठांमध्ये 22 कॅरेट सोनं ₹ 1,11,340 प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोनं ₹ 1,21,470  प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे.

पुणे आणि बेंगळुरूमधील सोन्याचे भाव

पुणे आणि बेंगळुरू या दोन्ही शहरांमध्येही भाव जवळपास समानच आहेत. 24 कॅरेट सोनं ₹1,21,470 प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोनं ₹1,11,340  प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे.

Gold Rate Today
Virat Kohli: 'किंग' कोहली आहे 11 कंपन्यांचा मालक; इथून करतो क्रिकेटपेक्षा जास्त कमाई

आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या वित्तीय संस्थांनीही पुढील दोन वर्षांसाठी सोन्याचे भाव वाढण्याचे संकेत दिले आहेत. गोल्डमन सॅक्सने अंदाज वर्तवला आहे की डिसेंबर 2026 पर्यंत सोन्याचा भाव 4,900 डॉलर  प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. तर ANZ बँकेनुसार, 2025च्या मध्यापर्यंत सोनं 4,600 डॉलर प्रति औंस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. डीएसपी मेरिल लिंचचं मत आहे की, “गोल्डमधील वाढ अजून थांबलेली नाही.”

चांदीही झाली स्वस्त

सोन्यासोबतच चांदीच्या भावातही सतत घट होत आहे. 6 नोव्हेंबर रोजी देशात चांदीचा भाव ₹1,50,400  प्रति किलो इतका झाला आहे. 5 नोव्हेंबर रोजी इंदौरच्या सराफा बाजारात प्रति किलो ₹ 500 ची घसरण झाली होती.

Gold Rate Today
Rahul Gandhi: कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीने केलं 22 वेळा मतदान; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

भाव घसरण्यामागची जागतिक कारणं

भारतामधील सोने-चांदीच्या भावावर देशांतर्गत मागणी, डॉलर इंडेक्स, व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली यांचा थेट परिणाम होत असतो. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा आक्रमक आर्थिक दृष्टिकोन आणि डॉलरची वाढ ही सध्याच्या घसरणीची प्रमुख कारणं मानली जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news