सबप्राईम पर्सनल लोनच्या अंतरंगात...

खराब क्रेडिट स्कोर असतानाही सबप्राईम पर्सनल लोन कसे मिळवावे?
Subprime Personal Loans For Good & Bad Credit
सबप्राईम पर्सनल लोनPudhari File Photo
Published on
Updated on
विधिषा देशपांडे

अलीकडच्या काळात कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वैयक्तिक कर्ज घेणार्‍यांची संख्या वाढली आहे. मात्र, आरबीआयने कडक नियम केल्याने बहुतांश बँका वैयक्तिक कर्ज देताना दहादा विचार करत आहेत. परिणामी, चांगला क्रेडिट स्कोर असलेल्या ग्राहकांनाच कर्ज देण्याबाबत बँका उत्सुक आहेत.

Subprime Personal Loans For Good & Bad Credit
चंद्रपूर: ट्रक- दुचाकी अपघातात शिक्षकाचा मृत्यू

750 पेक्षा अधिक स्कोर असणे चांगला क्रेडिट स्कोर समजला जातो आणि बँका त्यांनाच कर्ज देण्याबाबत रुची ठेवतात. पण, सिबिल स्कोर 620 पेक्षा कमी असेल बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते. आपणही अकारण खराब क्रेडिट स्कोरमुळे त्रस्त झालेला असाल आणि बँकांकडून कर्ज दिले जात नसेल तर ‘सबप्राईम पर्सनल लोन’चा विचार करू शकता. सबप्राईम पर्सनल लोन म्हणजे काय आणि खराब क्रेडिट स्कोर असतानाही बँक कशा रितीने कर्ज देते, ते पाहू.

Subprime Personal Loans For Good & Bad Credit
नागपूर: आरटीओविरोधात युवक काँग्रेसची कार्यालयावर धडक

परतफेडीच्या क्षमतेला प्राधान्य

अलीकडच्या काळात बहुतांश बँका क्रेडिट स्कोरऐवजी ‘रीपेमेट कॅपिसिटी’चा विचार करत आहेत. हा मार्ग पारंपरिक लेडिंगपेक्षा वेगळा आहे. सबप्राईम पर्सनल लोन देताना बँकांकडून काही बाबी तपासल्या जातात.

Subprime Personal Loans For Good & Bad Credit
Fact-Check : लोकसभा अध्‍यक्षांची मुलगी UPSC परीक्षा न देताच झाली आयएएस?

उत्पन्न आणि नोकरीची स्थिती

सबप्राईम पर्सनल लोन देताना बँकांकडून क्रेडिट स्कोरची तपासणी केली जात नाही. त्याचवेळी अर्जदाराचे उत्पन्न आणि नोकरीची स्थिती पाहिली जाते. अशावेळी बँका अर्जदाराच्या आर्थिक स्थितीबाबत समाधानी असतील आणि क्रेडिट स्कोर खराब असला तरी कर्ज देतील.

Subprime Personal Loans For Good & Bad Credit
दिल्लीतील पावसात मृत लोकांच्या कुटुंबीयांनी 10 लाखांची मदत

कर्जाच्या तुलनेत उत्पन्नाचे प्रमाण

आपल्या एकूण कर्जाच्या तुलनेत उत्पन्नाचे प्रमाण पाहिले जाते. यानुसार कर्जाचे प्रमाण अधिक असेल, तर नवे कर्ज फेडण्यास अडचणी राहू शकते. अशावेळी उत्पन्न चांगले असेल तर बँकांकडून कर्ज देण्याची तयारी राहते.

डाऊन पेमेंट किंवा गहाण

आपण बँकेकडे काही वस्तू गहाण ठेवल्याास किंवा डाऊन पेमेंट करण्यास सक्षम असाल, तर बँका कर्ज देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. सोने, राहत्या घराची कागदपत्रे, गुंतवणुकीची कागदपत्रे आदी गोष्टी बँकेला दाखवून कर्ज मिळवू शकता.

Subprime Personal Loans For Good & Bad Credit
काय तो निसर्ग... ; ब्ल्यू टॉपमध्ये एकटीच भाग्यश्री बीचवर हॉट

सबप्राईम लोनचा सिबिल स्कोरवर परिणाम

सबप्राईम लोनची परतफेड कशा रितीने करता, यावर सिबिल स्कोरची स्थिती अवलंबून आहे. सबप्राईम लोन नियमित रूपाने फेडत असाल, तर क्रेडिट स्कोर चांगला वाढेल. एखादाही हप्ता फेडण्यास असमर्थ राहिलात तर क्रेडिट स्कोर खराब होईल.

Subprime Personal Loans For Good & Bad Credit
धर्म मला मार्गदर्शन करतो : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सूचक विधान

सबप्राईम लोनसाठी अर्ज कसा करावा?

सबप्राइम पर्सनल लोन घेण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी बँकेला अर्ज करावा लागेल आणि हा अर्ज अन्य कर्जांप्रमाणेच असतो. सबप्राईम कर्ज देणार्‍या बँकेची निवड करा. त्यानंतर गरजेच्या आधारावर वाजवी दरात कर्ज देणार्‍या बँकेची निवड करा. कर्जाच्या प्रक्रिया शुल्काचा विचार करायला हवा. किंमत आणि व्याजदराचे आकलन करा. शुल्काचा समावेश झाल्यानंतर प्रारंभी थोडा कमी वाटणारा ‘एपीआर’(अपर्पीरश्र झशीलशपींरसश ठरींश) देखील खर्चात वाढ करू शकतो. या दरावर व्याजदराची आकारणी निश्चित होते. म्हणून आपल्या नियमित खर्चात ताळमेळ बसविणार्‍या कर्जाची निवड करावी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news