नागपूर: आरटीओविरोधात युवक काँग्रेसची कार्यालयावर धडक

विविध मागण्यांचे किरण बिडकर यांना निवेदन
RTO in Nagpur
नागपुरातील आरटीओविरोधात युवक काँग्रेसने कार्यालयावर धडक मारली Pudhari News Network

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: नागपुरातील प्रादेशिक परिवहन विभागातील अनागोंदी कारभार, आरटीओच्या अवैध वसुलीविरोधात युवक काँग्रेसने आज (दि.३०) आंदोलन केले. थेट हाती फलक घेऊन आरटीओ कार्यालयात निदर्शने करीत संताप व्यक्त केला.

RTO in Nagpur
नागपूर : रामटेक तीर्थक्षेत्र आराखडा, दुसऱ्या टप्प्यात २११ कोटींची मंजुरी

ऑटो, ई-रिक्षा, टॅक्सी, ट्रक आणि इतर वाहनांच्या फिटनेसच्या पासिंगसाठी प्रतिदिन 50 रुपये दंड भरण्याचा नवीन कायदा आहे. त्यामुळे टॅक्सी, ऑटो, ई-रिक्षा चालवणाऱ्या गरीब वाहन चालकांकडून हजारो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. ऑटो, ई-रिक्षा, ट्रक चालक मालक व इतरांना मोठा दंड ठोठावला जात आहे.

RTO in Nagpur
नागपूर: बुटीबोरीत १ कोटी २९ लाखांचा गुटखा जप्त

आदी प्रश्नी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे किरण बिडकर यांना निवेदन देण्यात आले. गरीब वाहनचालकांवर आधीच गाडीचा किराया घरभाडे, मुलांचे शिक्षण या सारख्या मोठया जवाबदाऱ्या असताना हजारो रुपयांचे चालान कसे भरायचे, असा प्रश्न वाहन चालकांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसिम खान यांच्यामार्फत आरटीओ अधिकाऱ्यांपुढे यावेळी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news