Stock Market Updates | बाजाराची तेजीत सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून खुला, 'हे' शेअर्स फोकसमध्ये

जाणून घ्या आजचे मार्केट
Stock Market
भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (दि.२८ एप्रिल) तेजीत सुरुवात केली. (AI Image)
Published on
Updated on

मुंबई : सकारात्मक जागतिक संकेतादरम्यान भारतीय शेअर बाजार सोमवारी (दि.२८) तेजीसह खुला झाला. सेन्सेक्सने ३०० हून अधिक अंकांनी वाढून ७९,५५० वर सुरुवात केली. तर निफ्टी ५० निर्देशांक ८२ अंकांच्या वाढीसह २४,१०० वर खुला झाला. त्यानंतर ही तेजी वाढत गेली. सकाळी पावणेदहाच्या सुमारास सेन्सेक्सने ७०० अंकांची वाढ नोंदवली. तर निफ्टी सुमारे १८० अंकांनी वाढला होता.

क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी ऑटो आणि बँकमध्ये तेजी तर आयटी निर्देशांकात (Nifty IT) विक्रीचा मारा दिसून आला.

रिलायन्सचा शेअर्स टॉप गेनर

सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर्स ३ टक्के वाढला आहे. रिलायन्सने रिटेल आणि डिजिटल सेवा व्यवसायातून मोठा नफा मिळवला आहे. चौथ्या तिमाहीतील कमाईच्या आकड्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी ठरली. यामुळे त्यांचे शेअर्स वधारले आहे.

त्याचबरोबर एम अँड एम, इंडसइंड बँक, एनटीपीसी, एसबीआय, Eternal हे शेअर्सही हिरव्या रंगात खुले झाले आहेत. तर एचसीएल टेक, मारुती, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स घसरले आहेत.

Stock Market
Stock Market | पहलगाम हल्ल्यामुळे शेअर बाजारात तणाव, ट्रेडर्सचे 'या' गोष्टीकडे लक्ष असणे गरजेचे

परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम

परदेशी गुंतवणूकदारांचा सलग आठव्या सत्रांत खरेदीवर जोर दिसून आला. आशियाई बाजारातून सकारात्मक संकेत आहेत. शुक्रवारी अमेरिकेतील शेअर बाजारातही तेजी राहिली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने सोमवारी तेजीसह सुरुवात केली.

पहलगाम हल्ल्यानतर भारत- पाकिस्तान भू-राजकीय तणाव असतानाही परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) भारतीय बाजारात खरेदी कायम ठेवली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी १७,४२४.८८ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे एनएसडीएलच्या आकडेवारीवरून दिसून आले.

Stock Market
एनपीएस खाते फ्रीज झाल्यास...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील भू- राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात दबाव दिसून आला होता. आता या आठवड्याची बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news