

Stock Market Updates Sensex Nifty Today
आशियाई बाजारात तेजी आणि देशांतर्गत महागाई अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच सहा वर्षांहून अधिक काळातील निचांकी पातळीवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी (दि. १५ जुलै) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी वाढून ८२,३७५ वर तर निफ्टी ५० निर्देशांक २२ अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,१०० वर होता. त्यानंतरच्या व्यवहारात ही तेजी वाढत गेली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढून ८२,७०० वर तर निफ्टी ५० निर्देशांक १४५ अंकांच्या वाढीसह २५,२०० वर व्यवहार करत होता. सर्व क्षेत्रीय निर्देशांकही हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.
सेक्टर्समधील ऑटो, फार्मा, रियल्टी, कन्झ्यूमर ड्युराबेल आणि ऑईल अँड गॅस निर्देशांकात मोठी वाढ दिसून आली. सुरुवातीला आयटी शेअर्समध्ये काही प्रमाणात दबाव दिसून आला. पण त्यानंतर आयटी शेअर्सने तेजीच्या दिशेने चाल केली. यामुळे निफ्टी आयटी ०.८ टक्के वाढला. निफ्टी आयटीवर विप्रो, LTIMindtree, इन्फोसिस, कोफोर्ज हे शेअर्स १ ते २ टक्के वाढले आहेत.
सेन्सेक्सवर सन फार्मा, एसबीआय, एम अँड एम, कोटक बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल हे शेअर्स ०.५ ते १ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर दुसरीकडे एचसीएल टेकचा शेअर्स जवळपास ४ टक्के घसरला आहे. टाटा स्टील, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, इर्टनल, टायटन हे शेअर्सही लाल रंगात व्यवहार करत आहेत.