

Stock Market Updates
भारतीय शेअर बाजारात सोमवारी (दि.२१ जुलै) सुरुवातीला चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स- निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली होती. पण त्यानंतर लगेच दोन्ही निर्देशांक सावरले. सकाळी ९.५७ वाजता सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून ८२ हजारांवर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक ७८ अंकांच्या वाढीसह २५ हजारांवर होता. त्यानंतरच्या व्यवहारातही तेजी कायम राहिली.
विशेषतः आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या हेवीवेट शेअर्समध्ये खरेदी दिसून आली आहे.
सेन्सेक्स सुरुवातीला जवळपास १५० अंकांनी घसरून ८१,६०० खाली आला होता. तर निफ्टी २५ हजारांच्या खाली खुला झाला होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांनी रिकव्हरी करत तेजीच्या दिशेने चाल केली.
सेन्सेक्सवर इर्टनल, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, भारता इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील हे शेअर्स तेजीत आहेत. तर दुसरीकडे रिलायन्सचा शेअर्स २ टक्के घसरला आहे. त्याचबरोबर हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक, टीसीएस, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा हे शेअर्सही घसरले आहेत.
जून तिमाहित नफा वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स वधारला आहे. एचडीएफसी बँकेचा शेअसही तेजीत व्यवहार करत आहे.
विदेशी गुंतवणूकदार खरेदीकडे वळले आहेत. आशियाई बाजारातही तेजीचा माहौल दिसून आला. या पार्श्वभूमीवर बाजारात सकारात्मक वातावरण राहिले आहे.