

Stock Market Today: जागतिक बाजारांकडून मिश्र संकेत मिळाल्याने भारतीय शेअर बाजाराने घसरणीसह सुरुवात केली. सुरुवातीला थोडी वाढ दिसली, मात्र काही मिनिटांतच बाजाराने दिशा बदलली आणि सेंसेक्स–निफ्टी दोन्ही लाल रंगात गेले. आज ऑटो इंडेक्समध्ये चांगली खरेदी झाली, तर FMCG, IT, मेटल आणि फार्मा क्षेत्रांमध्येही वाढ झाली. मीडिया, ऑयल अँड गॅस, रिअॅल्टी आणि प्रायव्हेट बँकिंग सेक्टर मात्र घसरले.
निफ्टी 50 गेनर्स: M&M, Reliance, Titan, SBI Life, Maruti, SBI, Tech Mahindra, Hindalco
निफ्टी लूजर्स: HDFC Life, Asian Paints, Infosys, Eternal, Axis Bank, Power Grid
सेंसेक्स: 85,791 (71 अंकांनी वाढून)
निफ्टी: 26,237 (22 अंकांनी वाढून)
बँक निफ्टी: 59,758 (21 अंकांनी वाढून)
करन्सी मार्केटमध्ये रुपया 10 पैशांनी घसरून 89.40/$ वर उघडला.
GIFT Nifty सकाळी 26,400 वर स्थिर दिसत होता. अमेरिकन बाजार Thanksgiving डे मुळे बंद राहिले, पण Dow Futures आज 90 अंकांनी वाढताना दिसत होता, यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.
काल भारतीय बाजारांनी ऑल टाईम हाय गाठल्यानंतर प्रॉफिट बुकिंग झाली.
FII ने एकूण ₹3,122 कोटींची विक्री केली
DII ने सलग 64 व्या दिवशी ₹4,000 कोटींची खरेदी केली
सोने: ₹400 घसरून ₹1,27,500
चांदी: ₹1,100 वाढून ₹1,62,500
क्रूड ऑईल: OPEC+ बैठकीच्या पार्श्वभूमीवर 1.5% वाढून $63 च्या आसपास व्यवहार करत आहे.
डॉलर इंडेक्स सलग तिसऱ्या दिवशी 100 च्या खाली, तर 10-year US bond yield जवळपास 4% वर स्थिर आहे.
रशिया–युक्रेन युद्धाबाबत पुतिन यांनी पहिल्यांदाच म्हटले की अमेरिकेच्या आणि युक्रेनच्या peace plan वर चर्चा पुन्हा सुरु होऊ शकते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.
बँकेने तब्बल ₹6,900 कोटींच्या NPA आणि written-off loans विकण्यास बोर्डाकडून मंजुरी मिळवली आहे. asset quality सुधारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे.
डिस्ट्रिब्युटर्ससाठी नवीन incentive structure, महिला गुंतवणूकदार आणि शहरांतील नवीन गुंतवणूकदारांना अतिरिक्त कमिशन मिळणार आहे.
दुसऱ्या तिमाहीचा GDP डेटा आज येणार असून 7.2% वाढीचा अंदाज आहे. ऑक्टोबरचा IIP डेटाही जाहीर होणार आहे. हे दोन्ही आकडे बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण करू शकतात.