Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांमध्ये चिंता

Stock Market Today: जागतिक तणाव, अमेरिकन बाँड यिल्डमध्ये वाढ आणि FIIs च्या विक्रीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला.
Stock Market
Stock MarketPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. जागतिक तणाव, अमेरिकन बाँड यिल्डमध्ये वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव दिसून आला. बाजार उघडताच BSE SENSEX 600 हून अधिक अंकांनी घसरला, तर NIFTY 50 सुमारे 170 ते 200 अंकांनी घसरत 23,450 च्या आसपास व्यवहार करत होता.

बँक निफ्टीत तब्बल 500 अंकांची घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी विक्री दिसून आली. मेटल (Metal) आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सवर सर्वाधिक दबाव होता.

कोणत्या सेक्टर्सवर सर्वाधिक दबाव?

रिअल्टी, ऑटो, PSU बँक, FMCG आणि केमिकल्स क्षेत्रातील निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरले. मात्र, फार्मा, हेल्थकेअर आणि IT क्षेत्रातील काही शेअर्समध्ये किरकोळ तेजी दिसली.

निफ्टी 50 मधील काही शेअर्समध्ये वाढ दिसून आली. त्यात Infosys, Tata Consultancy Services (TCS), Wipro, सन फार्मा आणि सिप्ला यांचा समावेश होता. तर टाटा स्टील, M&M, JSW स्टील आणि आयशर मोटर्स हे मोठे शेअर्स घसरले.

अमेरिका-इराण तणावामुळे बाजार हादरला

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा इशारा दिल्याने जागतिक बाजारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ट्रम्प यांनी “इराणने करार केला नाही तर पुढील दोन-तीन दिवसांत कारवाई होऊ शकते,” असा इशारा दिला. यामुळे आशियाई बाजार आणि GIFT Nifty वरही दबाव वाढला. जपान आणि दक्षिण कोरियाचे बाजार 1 ते 1.5 टक्क्यांपर्यंत घसरले. GIFT Nifty सुद्धा सुमारे 190 अंकांनी खाली आला.

अमेरिकी बाजारातही दबाव

अमेरिकन बाँड यिल्डमध्ये मोठी वाढ झाल्याने अमेरिकी बाजार घसरले. डाओ जोन्स 322 अंकांच्या खाली बंद झाला, तर नॅस्डॅक सलग तिसऱ्या दिवशी घसरला. अमेरिकेची 10 वर्षांची बाँड यिल्ड 4.65% च्या वर गेली असून ती 16 महिन्यांच्या उच्चांकावर आहे. मजबूत डॉलर आणि वाढती यिल्ड यामुळे उदयोन्मुख बाजारांवर दबाव वाढत असल्याचं मानलं जातं.

Stock Market
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलचे दर 120 रुपयांवर जाणार? तेल कंपन्यांनी दिले संकेत; ग्राहक चिंतेत

कच्चं तेल 111 डॉलरच्या वर

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे ब्रेंट क्रूडची किंमत 111 डॉलर प्रति बॅरलच्या वर कायम आहे. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे.

FIIs पुन्हा विक्रीच्या भूमिकेत

सलग तीन दिवस खरेदीनंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) पुन्हा विक्री केली. त्यांनी कॅश मार्केटमध्ये सुमारे 2457 कोटी रुपयांची विक्री केली. मात्र, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) सुमारे 3800 कोटी रुपयांची खरेदी करत बाजाराला काहीसा आधार दिला.

Stock Market
4 Day Work Week: आठवड्यात फक्त 4 दिवस ऑफिस? कर्मचाऱ्यांना सलग 3 दिवस सुट्टी मिळणार; फक्त ही अट पाळावी लागणार

आज बाजाराचं लक्ष कुठे?

आज Apollo Hospitals Enterprise आणि Grasim Industries यांच्या तिमाही निकालांकडे बाजाराचं लक्ष असेल. याशिवाय NCDEX वर देशातील पहिलं ‘Weather Futures’ उत्पादन लॉन्च होणार असून कृषी क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news