Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलचे दर 120 रुपयांवर जाणार? तेल कंपन्यांनी दिले संकेत; ग्राहक चिंतेत

Petrol-Diesel Price Hike: देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली असून पाच दिवसांत ही दुसरी दरवाढ आहे. तेल कंपन्यांनी ग्राहकांवर एकदम भार न टाकता टप्प्याटप्प्याने दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत.
Petrol Diesel Price Hike
Petrol Diesel Price HikePudhari
Published on
Updated on

Petrol-Diesel Price Hike: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा आणखी भार पडला आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सुमारे 90 पैशांनी प्रति लिटर वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांतील ही दुसरी दरवाढ आहे. यामुळे आता इंधनाचे दर 2022 प्रमाणे टप्प्याटप्प्याने सतत वाढणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

पाच दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ

याआधी 15 मे रोजी तेल कंपन्यांनी जवळपास चार वर्षांनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 19 मे रोजी पुन्हा 90 पैशांची वाढ करण्यात आली.

या ताज्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 98.64 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 91.58 रुपये प्रति लिटर झाला आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

“एकदम भार टाकायचा नाही”

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ग्राहकांवर अचानक मोठा आर्थिक भार पडू नये आणि महागाई नियंत्रणात राहावी यासाठी इंधन दर हळूहळू वाढवले जात आहेत.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “ग्राहकांना शक्य तितका दिलासा द्यायचा आहे. त्यामुळे दरवाढ एकाच वेळी करण्याचा आमचा विचार नाही. जागतिक परिस्थिती पाहता काही प्रमाणात दरवाढ आवश्यक आहे.”

मात्र, एकूण किती दरवाढ होईल, याचा अंतिम आकडा अद्याप ठरलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय उच्च स्तरावर घेतला जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.

Petrol Diesel Price Hike
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'ने जगभरात रचला इतिहास; 18 दिवसांत मोडले सर्व रेकॉर्ड, किती कोटी कमावले?

कच्च्या तेलाच्या किमतींमुळे दबाव

तेल कंपन्यांच्या मते, पश्चिम आशियातील तणाव, मध्यपूर्वेतील युद्धस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे इंधन दर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरवाढीनंतरही उन्हाळ्यात इंधनाची मागणी वाढत राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज तेल कंपन्यांनी व्यक्त केला आहे.

2022 सारखी परिस्थिती पुन्हा येणार?

रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात 2022 मध्ये तेल कंपन्यांनी सलग 13 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले होते. त्या वेळी अवघ्या 15 दिवसांत जवळपास 10 रुपयांनी दर वाढले होते.

मात्र, सध्याच्या परिस्थितीची तुलना 2022 शी करणे योग्य नसल्याचे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही टप्प्याटप्प्याने दरवाढ सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Petrol Diesel Price Hike
PM Kisan Update: PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्याबाबत महत्त्वाची अपडेट

महागाईचा धोका वाढला

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा थेट परिणाम महागाईवर होऊ शकतो. इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम अन्नधान्य, वस्तू आणि सेवांच्या किमतींवरही दिसून येतो. त्यामुळे पुढील काही महिन्यांत महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news