

Stock Market Today: शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. मार्केट ओपन होताच निफ्टी 25,900 च्या खाली आला. सेंसेक्समध्येही साधारण 60 अंकांची घसरण झाली. बँक निफ्टीनेही घसरणीसह सुरुवात केली. मात्र आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याने शेअर बाजाराला थोडा आधार मिळाला.
अमेरिकन बाजारात टेक आणि AI कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली.
Dow Jones 500 अंकांनी कोसळला आणि एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
Nasdaq 275 अंकांनी घसरला आणि पाच आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेला.
GIFT निफ्टीही सकाळी जवळपास 25,950 च्या आसपास ट्रेडिंग करत होता.
Dow Futures मात्र 50 अंकांनी वर होते, त्यामुळे थोडासा आधार मिळाला.
सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा घसरण झाली.
सोनं ₹400 ने घसरून ₹1,22,500
चांदी ₹950 ने घसरून ₹1,54,500
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. त्यामुळे ‘सेफ इन्व्हेस्टमेंट’ म्हणून सोने घेणाऱ्यांचा कल कमी होत आहे. कच्चे तेल जवळपास 1% वाढून $65 च्या आसपास पोहोचले. कॉपर, अल्युमिनियम आणि झिंक हे तिन्ही एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. निकेल तर सलग सहाव्या दिवशी घसरून सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.
DIIs (देशांतर्गत फंड्स) बाजाराला आधार देत आहेत. मंगळवारी ₹6,157 कोटींची नेट खरेदी करून त्यांनी सलग 57 दिवसांपासूनची खरेदी कायम ठेवली. FIIs (परदेशी गुंतवणूकदार) मात्र अजूनही सेलिंग मोडमध्ये आहेत. मंगळवारी त्यांनी कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून एकूण ₹3,053 कोटींची विक्री केली. याचा अर्थ भारतीय गुंतवणूकदार बाजाराला आधार देत आहेत तर परदेशी गुंतवणूकदार अजूनही विक्री करत आहेत
Excelsoft Technologies IPO खुला
प्राइस बँड: ₹114–₹120. या IPO कडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
हा IPO 59 पट सब्सक्राइब झाला होता, त्यामुळे लिस्टिंगवर जोरदार प्रतिसादाची शक्यता.
कंपनीचा सर्वात मोठा ₹18,000 कोटींचा बायबॅक आजपासून सुरू झाला. बायबॅक किंमत ₹1,800 आहे. यामुळे इन्फोसिसच्या शेअर्सला आधार मिळू शकतो.