Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी 22,700 च्या खाली, आज गुंतवणूकदारांचे 1.7 लाख कोटी बुडाले

Stock Market Today: शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली असून निफ्टी 22,700 च्या खाली घसरला आहे.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Stock Market Today: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. निफ्टी 48 अंकांनी घसरून 22,732 वर, तर सेन्सेक्स 138 अंकांनी घसरून 72,633 वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात बाजारावरील दबाव आणखी वाढला आणि निफ्टी 100 अंकांहून अधिक घसरून 22,700 च्या खाली गेला.

आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.7 लाख कोटी रुपयांची घट झाली. बीएसईवर कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 472.63 लाख कोटी रुपयांवर आले आहे. सोमवारीही बाजारात मोठी घसरण झाली होती. निफ्टी 360 अंकांनी घसरून 22,780 वर, तर सेन्सेक्स तब्बल 1,124 अंकांनी घसरून 72,771 वर बंद झाला होता.

अमेरिका-इराण तणावाचा बाजारावर परिणाम

अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत अद्याप ठोस प्रगती झालेली नाही. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून क्रूड ऑइलचा भाव 107 डॉलरच्या आसपास पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई वाढण्याची आणि व्याजदरांवर दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अमेरिकेतील बाँड यिल्डमध्येही वाढ झाली आहे. त्याचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर झाला. काल अमेरिकेच्या बाजारात प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली. डाऊ जोन्स 347 अंकांनी घसरला, तर नॅस्डॅक 248 अंकांनी खाली आला. आशियाई बाजारातही घसरण दिसून येत आहे. निक्केई आणि कोस्पीमध्ये सुमारे एक टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.

FII ची मोठी विक्री

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. काल FII ने 5,353 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. त्याचवेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच DII ने 5,189 कोटी रुपयांची खरेदी केली.

दरम्यान, सोने आणि चांदीच्या दरातही घसरण झाली. देशांतर्गत बाजारात काल सोन्याचा भाव सुमारे 4,100 रुपयांनी कमी झाला, तर चांदीच्या दरात 7,250 रुपयांची घट झाली.

एक्सपायरीच्या दिवशी बाजारावर दबाव?

आज निफ्टीची मंंथली एक्सपायरी आहे. मागील सातपैकी सहा एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीमध्ये घसरण झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. ऑगस्टमध्ये मात्र एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी 115 अंकांनी वाढला होता.

मागील सहा एक्सपायरीमध्ये निफ्टी 11 ते 488 अंकांपर्यंत घसरला होता. तसेच मागील सात एक्सपायरीमध्ये बँक निफ्टी प्रत्येक वेळी घसरला असून, त्याची घसरण 12 ते 1,999 अंकांपर्यंत होती.

Stock Market Today
UPI MDR Charges: UPI वर चार्ज का? MDR मधून नेमकी कोणाची कमाई होणार? सुप्रीम कोर्टाचा सरकार आणि RBIला थेट सवाल

निफ्टीसाठी 22,600 महत्त्वाचा आधार

SAMCO Securitiesचे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट ओम मेहरा यांच्या मते, निफ्टी 22,800 च्या खाली बंद झाल्याने बाजारातील घसरण आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निफ्टीचा RSI 28 वर आला असून, तो बाजार ओव्हरसोल्ड स्थितीत असल्याचे दर्शवतो. त्यामुळे काही प्रमाणात रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या बाजारात वाढीचे संकेत स्पष्टपणे दिसत नाहीत.

Stock Market Today
Essar Group: ट्रम्पही झाले खूश! एस्सार ग्रुप अमेरिकेत उभारणार जगाला टक्कर देणारा स्टील प्लांट, किती कोटींची गुंतवणूक केली?

निफ्टीसाठी 22,600 हा महत्त्वाचा आधार मानला जात आहे. त्यानंतर 22,500 हा पुढील आधार आहे. बाजारात ओव्हरसोल्ड स्थितीमुळे वाढ झाली तर 22,900 हा पहिला अडथळा ठरू शकतो. त्यानंतर 23,100 ही महत्त्वाची पातळी आहे.

सध्याच्या परिस्थितीत बाजारात वाढ झाली तरी विक्रीचा दबाव येण्याची शक्यता असल्याने, आगामी काळात ‘Sell on Rise’ म्हणजे बाजार वाढल्यानंतर विक्री होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news