Stock Market Today: जागतिक संकटातही भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी 24,200 च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: अमेरिकन शेअर बाजारातील मोठी घसरण आणि अमेरिका-इराण तणाव असूनही भारतीय शेअर बाजाराने स्थिर सुरुवात केली आहे.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: अमेरिका-इराणमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतरही भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी स्थिर सुरुवात केली. निफ्टी अवघ्या 1 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 24,249 वर उघडला, तर सेन्सेक्स 15 अंकांनी घसरून 77,638 वर सुरू झाला. बुधवारी मात्र बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती आणि निफ्टी 265 अंकांच्या वाढीसह 24,250 वर बंद झाला होता.

डॉलरच्या तुलनेत रुपया सलग तिसऱ्या दिवशी मजबूत झाला असून आज तो 6 पैशांनी वधारत 95.59 वर उघडला. रुपयातील ही तेजी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे.

IT, ऑटो आणि FMCG शेअर्समध्ये तेजी

आजच्या व्यवहारात आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. निफ्टी IT निर्देशांक जवळपास 1.75 टक्क्यांनी वधारला. याशिवाय ऑटोमोबाईल, FMCG आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्येही खरेदीचा कल होता. मात्र बँकिंग, वित्तीय सेवा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्सवर दबाव कायम राहिला.

इराण-अमेरिका संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरपर्यंत पोहोचली आहे. भारतासारख्या तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशासाठी हा नकारात्मक संकेत मानला जात आहे, कारण यामुळे महागाई आणि आयात खर्च वाढण्याची शक्यता आहे.

Stock Market Today
Nitin Gadkari: E20 पेट्रोलमुळे गाड्यांच्या रबरी भागांचे नुकसान? इंजिनमध्ये बदल करावा लागणार? राज्यसभेत गडकरींचा मोठा खुलासा

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावर पुन्हा विश्वास

जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणातही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) भारतीय बाजारात खरेदी करत असल्याचे चित्र आहे. बुधवारी FII ने रोख बाजार, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून निव्वळ 7,955 कोटी रुपयांची खरेदी केली. यामध्ये केवळ रोख बाजारातच 2,981 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्याचवेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 998 कोटी रुपयांची खरेदी केली.

फेडच्या निर्णयानंतर अमेरिकन बाजारात मोठी घसरण

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग पाचव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केला नाही. मात्र महागाईबाबत अजूनही अनिश्चितता कायम असून व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहू शकतात, असे फेडच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले. या वक्तव्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी विक्री झाली.

डाओ जोन्स निर्देशांक तब्बल 1,150 अंकांनी घसरला, ही गेल्या 15 महिन्यांतील सर्वात मोठी घसरण होती. नॅस्डॅकमध्ये 434 अंकांची घसरण झाली. याशिवाय डॉलर निर्देशांक मजबूत झाला, तर अमेरिकन बाँड यिल्डमध्येही वाढ झाली.

Stock Market Today
Ram Mandir Trust: IIT बॉम्बेपासून ते राम मंदिर ट्रस्टपर्यंत! सचिवपदाची धुरा संभाळणारे पुण्याचे जगदीश आफळे कोण आहेत?

आशियाई बाजारांची संमिश्र कामगिरी

गुरुवारी आशियातील प्रमुख बाजारांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा KOSPI निर्देशांक सुमारे 1 टक्क्यांनी वधारला. सॅमसंगने अपेक्षेपेक्षा चांगले आर्थिक निकाल जाहीर केल्यामुळे दक्षिण कोरियन बाजाराला आधार मिळाला.

आज निफ्टीसाठी महत्त्वाचे स्तर कोणते?

SAMCO Securities चे तांत्रिक विश्लेषक ओम मेहरा यांच्या मते, निफ्टीचा अल्पकालीन कल अद्याप सकारात्मक आहे. 24,130 आणि 24,080 हे महत्त्वाचे सपोर्ट स्तर आहेत. तर वरच्या बाजूला 24,370 आणि त्यानंतर 24,470 हे प्रमुख रेसिस्टन्स स्तर असतील. त्यामुळे घसरणीमध्ये खरेदी (Buy on Dips) करण्याची रणनीती सध्या फायदेशीर ठरू शकते.

नोंद: गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news