Stock Market Today: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; निफ्टी 26,170च्या जवळ, कोणते शेअर्स घसरले?

Stock Market Today: आठवड्याच्या एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली असून निफ्टी 26,170 च्या आसपास आहे. IT शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसत असला, तरी देशांतर्गत गुंतवणूकदारांची खरेदी वाढत आहे.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आठवड्याच्या एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली. सुरुवातीच्या काही मिनिटांत सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात होते, मात्र थोड्याच वेळात बाजार घसरणीकडे वळला.

सेन्सेक्स सुमारे 55 अंकांनी घसरून 85,512 च्या आसपास ट्रेड करत होता, तर निफ्टी 14 अंकांच्या घसरणीसह 26,158 च्या पातळीवर दिसत होता. बँक निफ्टी मात्र 35 अंकांच्या किरकोळ वाढीसह 59,339 वर होता. तरीही एकूण बाजारात सुमारे 60 टक्के तेजीचा कल कायम असल्याचं चित्र होतं.

देशांतर्गत आणि जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजार सध्या संतुलित पण सकारात्मक आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) कॅश सेगमेंटमध्ये थोडी विक्री केली असली, तरी डेरिव्हेटिव्ह्समधील त्यांची खरेदी बाजाराला आधार देत आहे. दुसरीकडे, देशांतर्गत फंडांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे.

FIIs आणि DIIs

सलग तीन दिवसांच्या खरेदीनंतर FIIs ने कॅश मार्केटमध्ये सुमारे 457 कोटी रुपयांची विक्री केली. मात्र इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून त्यांची एकूण नेट खरेदी तब्बल 3,361 कोटी रुपये इतकी होती. यावरून परदेशी गुंतवणूकदार अजूनही बाजारात टिकून आहेत, असं दिसत आहे.

दरम्यान, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग 81व्या दिवशी बाजारात पैसा ओतत सुमारे 4,058 कोटी रुपयांची जोरदार खरेदी केली. सध्या बाजारासाठी देशांतर्गत गुंतवणूक हाच सर्वात मोठा आधार ठरत आहे.

Stock Market Today
Rajya Sabha Elections: 2026 मध्ये राज्यसभेचं गणित बदलणार; 75 जागांवर होणार निवडणुका, कुणाचं पारडं जड?

अमेरिकेकडून टेक शेअर्सचा सपोर्ट

अमेरिकन बाजारात टेक शेअर्समधील तेजी तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. डाओ जोन्स 225 अंकांनी वाढून बंद झाला, तर नॅस्डॅकमध्ये सव्वाशे अंकांची वाढ पाहायला मिळाली. मात्र आज अमेरिकेत GDP आणि IIP डेटा जाहीर होणार असल्याने डाओ फ्युचर्स थोडे सुस्त दिसत आहेत. GIFT निफ्टी मात्र सुमारे 30 अंकांच्या वाढीसह 26,230 च्या आसपास ट्रेड करत आहे.

कमोडिटी बाजारात नवे विक्रम

कमोडिटी बाजारात तेजीचा जोर कायम आहे. देशांतर्गत बाजारात सोनं थेट 1 लाख 36 हजार 820 रुपयांवर लाइफ-टाईम हायवर पोहोचलं, तर चांदीने 2 लाख 14 हजार 583 रुपयांचा नवा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं प्रथमच 4,500 डॉलरच्या पुढे गेलं असून चांदी 79.5 डॉलरच्या वर पोहोचली आहे.

बेस मेटल्समध्येही तेजी दिसत असून कॉपरने नवा उच्चांक गाठला आहे, अ‍ॅल्युमिनियम 44 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर, तर निकेल दोन महिन्यांच्या टॉपवर आहे. कच्च्या तेलानेही सलग चौथ्या दिवशी तेजी दाखवत 2 टक्क्यांची वाढ घेत 62 डॉलरच्या वर मजल मारली.

Stock Market Today
Gold Loan: सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर, पण आता गोल्ड लोन घेतल्यावर मिळणार कमी पैसे, असं का?

कॉर्पोरेट सेक्टर अपडेट्स

सिमेंट क्षेत्रात मोठी घडामोड पाहायला मिळाली. Ambuja Cement च्या बोर्डाने ACC आणि Orient Cement यांच्या मर्जरला मंजुरी दिली आहे. या व्यवहारानुसार ACC चे 100 शेअर्समागे Ambuja चे 328 शेअर्स, तर Orient Cement च्या 100 शेअर्समागे Ambuja चे 33 शेअर्स मिळणार आहेत.

IRCTC मार्च सिरीजपासून F&O सेगमेंटमधून बाहेर पडणार असून 25 फेब्रुवारीनंतर हा शेअर डेरिव्हेटिव्ह्समध्ये राहणार नाही. प्राथमिक बाजारात Gujarat Kidney & Super Speciality चा IPO पहिल्याच दिवशी सुमारे दीडपट सब्सक्राइब झाला आहे. KSH International आज शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. याशिवाय, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीमध्ये नवीन EV पॉलिसीचा मसुदा येण्याची शक्यता असून पेट्रोल वाहनांवरून EV कडे वळणाऱ्यांना मोठी सबसिडी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news