Stock Market Today: शेअर बाजारात जबरदस्त तेजी; सेन्सेक्स 600 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Stock Market Today: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली असून सेन्सेक्स 600 अंकांनी आणि निफ्टी 170 अंकांनी वाढला. PSU बँक आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली, तसेच निफ्टीच्या 50 पैकी 47 शेअर्समध्ये वाढ दिसली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराने जोरदार कमबॅक केला. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 600 अंकांनी वाढला, तर निफ्टीमध्ये 170 अंकांची वाढ दिसून आली. आज निफ्टीच्या 50 पैकी 47 शेअर्समध्ये खरेदी सुरू होती. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण होतं.

ओपनिंगचे आकडे काय होते?

कालच्या क्लोजिंगच्या तुलनेत—

  • सेन्सेक्स 550 अंकांनी वाढून 82,459 वर उघडला

  • निफ्टी 187 अंकांनी वाढून 25,344 वर उघडला

  • बँक निफ्टी 394 अंकांनी वाढून 59,194 वर उघडला

  • रुपया 17 पैशांनी वाढून 91.53 प्रति डॉलरवर उघडला

Stock Market Today
Mumbai Air Pollution: मुंबईच्या प्रदूषित हवेत हायकोर्टाची चांगलीच ‘बरसात’; पालिकेच्या उपाययोजनांवर तीव्र नाराजी

PSU बँक आणि ऑटो सेक्टरला मोठा फायदा

आजच्या ट्रेडिंगमध्ये PSU बँक आणि ऑटो सेक्टरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी होती. निफ्टी मिडकॅप सेलेक्ट वाढीसह व्यवहार करत होता तर निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्येही चांगली खरेदी दिसली.

शेअर बाजार वाढण्यामागे कारणं काय?

1) जागतिक बाजारातून पॉझिटिव्ह संकेत

दावोसहून आलेल्या काही सकारात्मक संकेतांमुळे जागतिक बाजारात उत्साह दिसला. त्यामुळे भारतीय बाजारालाही आधार मिळाला. GIFT निफ्टी वाढीसह ट्रेड होत होता, डाओ फ्युचर्स तेजीत होते तर आशियाई बाजारात जपानचा निक्केई वाढला.

Stock Market Today
Mumbai Gold price hike : मुंबईत 1,75,830 रुपये तोळा झाले सोने ; एकाच दिवसात तोळ्यामागे 10 हजार रुपयांची वाढ

2) टॅरिफ आणि ट्रेड डी

ग्रीनलँड आणि टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेकडून मवाळ भूमिका दिसल्याने जागतिक बाजारांना दिलासा मिळाला. त्यामुळे ट्रेड सेंटिमेंटही सुधारले.

3) सोने-चांदी पुन्हा वाढले

कमोडिटी मार्केटमध्येही हालचाल वाढली आहे. एमसीएक्सवर सोनं मोठ्या वाढीसह नवे उच्चांक गाठत होते, तर चांदीही रेकॉर्ड लेव्हलच्या जवळ दिसली. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडेही लक्ष वाढत असल्याचं चित्र आहे.

FII विक्रीत, पण DIIचा मजबूत आधार

परदेशी गुंतवणूकदार (FII) सलग विक्री करत असले तरी आज घसरण जास्त झाली नाही.
दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DII) सलग 101व्या दिवशी खरेदी सुरू ठेवत बाजाराला आधार दिला.

थोडक्यात तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसली. PSU बँक आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी झाली, जागतिक संकेतही सकारात्मक होते आणि DIIच्या खरेदीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news