Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा तेजीचा सूर! निफ्टी 23,250 पार; विकली एक्सपायरीच्या दिवशी जोरदार खरेदी

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात करत निफ्टी 23,259 आणि सेन्सेक्स 74,035 वर उघडला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीला मोठ्या घसरणीचा सामना करणाऱ्या भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी दमदार पुनरागमन केले. विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात खरेदीचा जोर दिसून आला आणि प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात उघडले.

निफ्टी 136 अंकांच्या वाढीसह 23,259 वर खुला झाला, तर सेन्सेक्सने 511 अंकांची उसळी घेत 74,035 या पातळीवर सुरुवात केली. सोमवारी बाजारात मोठी घसरण झाली होती. निफ्टी 244 अंकांनी घसरून 23,123 वर, तर सेन्सेक्स 719 अंकांच्या घसरणीसह 73,524 वर बंद झाला होता. त्यामुळे आजची तेजी गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरली.

मंगळवारी आयटी क्षेत्र वगळता जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक तेजीत व्यवहार करत होते. ऑटो, खासगी बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये विशेष खरेदी दिसून आली. दुसरीकडे आयटी निर्देशांकात किरकोळ 0.2 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

निफ्टीतील ट्रेंट, इंडिगो आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस हे दिवसाच्या सुरुवातीचे आघाडीचे गेनर्स ठरले. या शेअर्समध्ये जवळपास 3 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. तर टाटा स्टील, NTPC आणि इन्फोसिस या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली.

बाजारातील सकारात्मक वातावरणामागे काही महत्त्वाचे जागतिक घटक कारणीभूत ठरत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी सध्या हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतल्याने मध्यपूर्वेतील तणाव काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.

याशिवाय अमेरिकेत H-1B व्हिसावर प्रस्तावित करण्यात आलेली 1 लाख डॉलर्सची अतिरिक्त फी न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे. या निर्णयामुळे भारतीय आयटी कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रावर असलेला दबाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Stock Market Today
Petrol Price Breakdown: सरकारला एक लिटर पेट्रोल किती रुपयांना पडतं? मग पंपावर किंमत दुप्पट कशी होते? जाणून घ्या संपूर्ण गणित

कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण सुरू असून ब्रेंट क्रूड पुन्हा 93 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आले आहेत. कच्चे तेल स्वस्त होणे ही भारतासारख्या आयातदार देशासाठी सकारात्मक बाब मानली जाते. त्याचा फायदा रुपयालाही झाला असून रुपया 24 पैशांनी मजबूत होत 95.47 वर उघडला.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) सोमवारी 5,555 कोटी रुपयांची विक्री केली होती. मात्र देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 5,165 कोटी रुपयांची खरेदी करून बाजाराला आधार दिला. त्यामुळे बाजारातील घसरण आणखी वाढण्यापासून थांबली.

तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीने निफ्टीसाठी 23,300 ही महत्त्वाची प्रतिकार पातळी मानली जात आहे. तर 23,070 हा आधार आहे. ही पातळी तुटल्यास निर्देशांक 22,700 ते 22,800 या झोनकडे घसरू शकतो, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे.

Stock Market Today
Arjun Tendulkar IPL debut |'क्रिकेट तुमच्या संयमाचीही परीक्षा घेते!' : सचिनने मुलासाठी लिहिली खास आणि भावूक पोस्ट

विशेष म्हणजे तज्ज्ञांच्या मते आजचा दिवस निफ्टीसाठी ‘मेक ऑर ब्रेक’ ठरू शकतो. कारण गेल्या काही दिवसांतील महत्त्वाचे गॅप आणि सपोर्ट लेव्हल्स निफ्टीने पूर्ण केले आहेत. आता 23,000 च्या खाली क्लोजिंग झाल्यास मोठी घसरण दिसू शकते. उलट 23,300 च्या वर टिकून राहिल्यास बाजारात पुन्हा तेजीचा ट्रेंड मजबूत होऊ शकतो.

एकूणच, जागतिक तणावात झालेली घट, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण, रुपयातील तेजी आणि विकली एक्सपायरीमुळे वाढलेली खरेदी यामुळे भारतीय शेअर बाजाराने आज सकारात्मक सुरुवात केली आहे. मात्र दिवसअखेर बाजार कोणत्या दिशेने जातो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news